टाटा पॉवर -बीपीसीएलमध्ये २५० कोटींचा करार

टाटा पॉवर -बीपीसीएलमध्ये २५० कोटींचा करार
Published on: 

टाटा पॉवर-बीपीसीएलमध्ये २५० कोटींचा करार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : टाटा पॉवर आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) यांच्यात वीज पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. बीपीसीएलच्या मुंबई रिफायनरीतील प्रकल्पासाठी आवश्यक असलेली ९० मेगावॉट वीज उपलब्ध करून देण्यासाठी टाटा पॉवर ११० केव्हीची वीजजोडणी विकसित करणार आहे. या कामासाठी दोन्ही कंपन्या मिळून सुमारे २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.

बीपीसीएलच्या मुंबई रिफायनरीमध्ये पेट्रो रेसिड फ्लुइडाइज्ड कॅटॅलिटिक क्रॅकिंग युनिट (पीआरएफसीसीयु) हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे उच्च मूल्य असलेल्या उत्पादनांची निर्मिती वाढवण्यास मदत होणार आहे. तसेच पेट्रोकेमिकल क्षेत्रातील विविध उत्पादनांच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. करारानुसार, टाटा पॉवर या प्रकल्पासाठी ११० केव्हीची वीजजोडणी उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या वीज पायाभूत सुविधांचे नियोजन, रचना आणि उभारणीही कंपनी करणार आहे. वीजजोडणी आणि पारेषण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी गुंतवणूक केली जाणार आहे. आवश्यक मंजुरी मिळवून संपूर्ण काम २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे दोन्ही कंपन्यांचे नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com