एपीएमसी फळ बाजारात देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल!

एपीएमसी फळ बाजारात देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल!
Published on: 

नवी मुंबई ‘एपीएमसी’त देवगड हापूस दाखल

जुईनगर, ता. ३० (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) फळ बाजारात यंदाच्या हंगामातील देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी गुरुवारी संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर दाखल झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील विजयदुर्ग-घरीवाडी आणि वाडा येथील बागायतदारांनी ही पेटी बाजारात पाठवली आहे. हंगामातील पहिल्याच हापूसचे व्यापाऱ्यांनी उत्साहात स्वागत केले. सहा डझन आंब्यांच्या या पेटीला १५ ते २५ हजार रुपये भाव मिळण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अक्षय पुंडे तसेच जनार्दन अँड कंपनी या व्यापाऱ्यांकडे हापूसच्या पेट्या दाखल झाल्या आहेत. बागायतदार वीरेंद्र कांबळी, नीलेश बांधकर आणि विद्याधर बांधकर यांच्या बागेतील हे आंबे आहेत. परतीच्या पावसाने दडी मारल्याने आंब्याचा मोहोर टिकून राहिला, असे बागायतदारांनी सांगितले. सध्या एपीएमसीच्या फळबाजारात केरळ आणि तमिळनाडू येथून आंब्याची आवक सुरू आहे. या आंब्यांची विक्री प्रतिकिलो सुमारे ६०० रुपये भावाने होत आहे. देवगड हापूसच्या आगमनामुळे यंदाच्या आंबा हंगामाची चाहूल लागली आहे.

दरम्यान, हापूसची पहिली पेटी बाजारात दाखल झाली असली, तरी मुख्य हंगाम सुरू होण्यासाठी अद्याप काही कालावधी आहे. दरवर्षी वाशी एपीएमसीच्या फळबाजारात फेब्रुवारीपासून हापूसची आवक सुरू होते. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत आंब्याचा हंगाम बहरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.