दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन

दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन
Published on: 

दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन

मुंबई, ता. ३१ : ‘काँटे’, ‘जिंदा’ आणि ‘काबिल’ यांसारख्या चित्रपटांतून गुन्हेगारी विश्व, संघर्ष आणि थरारपटांची वेगळी शैली निर्माण करणारे प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक व निर्माते संजय गुप्ता (वय ५७) यांचे शनिवारी निधन झाले. वर्सोवा येथील राहत्या घरी ते मृतावस्थेत आढळले. घरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या प्राथमिक तपासानुसार, तोल जाऊन पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.‌

अपघातानंतर गुप्ता यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी कुटुंबीयांनी काहीही संशय व्‍यक्त केलेला नाही किंवा तक्रार दिलेली नाही. वर्सोवा पाेलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नाेंद केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पाेलिसांनी दिली.
गुप्ता यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून काम केले आहे. अमिताभ बच्चन, संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांच्या भूमिका असलेला ‘काँटे’ हा त्यांचा गाजलेला चित्रपट ठरला. तसेच जॉन अब्राहम आणि संजय दत्त यांच्या भूमिका असलेला ‘जिंदा’ तसेच हृतिक रोशन आणि यामी गौतम यांच्या भूमिका असलेल्या ‘काबिल’ या चित्रपटांचेही त्यांनी दिग्दर्शन केले होते. विवेक ओबेरॉय आणि संजय दत्त यांच्या भूमिका असलेला ‘शूटआऊट ॲट लोखंडवाला’ या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली हाेती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.