‘वॉकहार्ट फाउंडेशन’ची आरोग्यसेवेत भरारी

‘वॉकहार्ट फाउंडेशन’ची आरोग्यसेवेत भरारी
Published on: 

मुंबई, ता. २ : वॉकहार्ट लि.ची समाजसेवी शाखा असलेल्या वॉकहार्ट फाउंडेशनच्या ‘मोबाईल १०००’ या आरोग्यसेवा उपक्रमाने देशभरात ५.११ कोटी रुग्णसेवा संवादांचा टप्पा ओलांडला आहे. या उपक्रमाद्वारे दुर्गम आणि आरोग्यसेवेपासून वंचित समुदायांपर्यंत प्राथमिक आरोग्यसेवा पोहोचवली जात आहे.

देशातील २१ राज्यांतील जवळपास ७३ जिल्हे आणि सुमारे २,९१९ गावांमध्ये २११ फिरत्या वैद्यकीय पथकांद्वारे हा उपक्रम राबवला जातो. जनजागृती, रोगनिदान, उपचार आणि संदर्भसेवा (एडीसीआर) आधारित उपक्रमात मोफत डॉक्टरी सल्ला, आवश्यक वैद्यकीय चाचण्या, ब्रँडेड जेनेरिक औषधे, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी, जनजागृती आणि पुढील उपचारांसाठी संदर्भसेवा दिली जाते.

डिजिटल रुग्ण नोंदी आणि जागेवरच निदान करण्याच्या सुविधांमुळे आजारांचे लवकर निदान आणि वेळेवर उपचार शक्य होतात. अद्यापही देशाच्या दुर्गम आणि ग्रामीण भागात रास्त दरात आरोग्यसेवा पोहोचवण्याचे मोठे आव्हान आहे, असे वॉकहार्ट फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हुजैफा खोराकीवाला म्हणाले. पाच कोटी रुग्णसेवेचा टप्पा आम्ही गाठणे यातूनच देशातील दुर्गम भागातील आरोग्यसेवेची गरज दिसते.

आरोग्यसेवेची उपलब्धता वाढवण्यासाठी दीर्घकालीन सहकार्य आवश्यक आहे. सरकार, आरोग्यसेवा पुरवठादार, कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम आणि स्थानिक समुदाय यांच्या भागीदारीतून शेवटच्या टप्प्यापर्यंत सेवा पोहोचवता येते. १,००० फिरत्या वैद्यकीय पथकांचे उद्दिष्ट साध्य करताना अधिक समुदायांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवण्यावर आमचा भर राहील.
- अजय सोमवंशी, मुख्य परिचालन अधिकारी, वॉकहार्ट फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.