मतदार यादी सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ

मतदार यादी सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ
Published on: 

मतदार यादी दुरुस्तीसाठी मुदतवाढ
दावे-हरकती दाखल करण्यासाठी १३ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ

पालघर, ता. २ (बातमीदार) : विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेंतर्गत मतदार याद्यांमधील नावांची नोंदणी, दुरुस्ती आणि हरकती दाखल करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या विनंतीनुसार दावे व हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असून, अंतिम मतदार यादी ३० नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.

या मोहिमेंतर्गत १ ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, पात्र नागरिकांना मतदार यादीतील नोंदी तपासण्यासाठी आणि आवश्यक दावे-हरकती दाखल करण्यासाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी आयोगाने वेळापत्रकात सुधारणा केली आहे.

पालघर जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे की नाही तसेच नाव, पत्ता आणि अन्य तपशील अचूक आहेत का याची खात्री करावी. मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र नागरिकांनी तसेच नोंदींबाबत दावे किंवा हरकती असलेल्या मतदारांनी १३ नोव्हेंबरपर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत अर्ज सादर करावेत.

मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक होण्यासाठी जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी मुदतवाढीचा लाभ घ्यावा आणि आवश्यक दावे-हरकती वेळेत दाखल करून निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.