

दोन मुलांसह आईची आत्महत्या
पैसेवसुलीसाठी त्रास देणाऱ्या पती-पत्नीवर गुन्हा
खालापूर, ता. ३ (बातमीदार) ः पतीच्या आर्थिक व्यवहाराची वसुली करण्यासाठी कुटुंबाला होत असलेल्या मनस्तापातून मानसी मच्छिंद्र पोपेटे (वय ३५) यांनी मुलगा रुद्र (११) आणि मुलगी हंसिका (६) यांच्यासह अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री हिरानंदानी भोकरपाडा येथे घडली. घटनेतील तिघांचाही उपचारापूर्वी मृत्यू झाला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विश्वनाथ देसाई आणि अक्षरा देसाई (दोन्ही रा. पुणे) यांच्या विरोधात रसायनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मच्छिंद्र हे स्थावर मालमत्तेचे व्यवहार काम पाहत असून, एका व्यवहार प्रकरणात अक्षरा आणि विश्वनाथ देसाई यांच्याकडून दोन लाख रुपये कमिशन घेतले होते; परंतु तो व्यवहार पूर्ण न झाल्याने कमिशनपोटी दिलेले पैसे देसाई परत मागत होते. आर्थिक अडचण असल्याने पैसे देण्यात विलंब होत होता. देसाई त्यावरून त्रास देत होते. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास देसाई पती-पत्नी मच्छिंद्र याच्या भोकरपाडा हिरानंदानी येथील फ्लॅटवर पैसे मागण्यासाठी गेले होते. मच्छिंद्र घरी नसल्याने त्यांनी त्याची पत्नी मानसी हिला शिवीगाळ करत पैशांची मागणी केली. हा त्रास असह्य झाल्याने मानसी यांनी दोन मुलांसह अकराव्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी तिघांचाही रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, मच्छिंद्र यांनी रसायनी पोलिस ठाण्यात देसाई पती-पत्नी विरोधात तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, पोलिस निरीक्षक अभिजित भुजबळ यांनी घटनास्थळी भेट दिली असून, आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केल्याची माहिती दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.