फॅन, रेफ्रिजरेटरवर ६० टक्क्यांपर्यंत सवलत

फॅन, रेफ्रिजरेटरवर 
६० टक्क्यांपर्यंत सवलत
Published on: 

सिलिंग फॅन, रेफ्रिजरेटरवर
६० टक्क्यांपर्यंत सवलत

अदाणी इलेक्ट्रिसिटीचा वीजबचतीसाठी उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : वीजबचतीला प्रोत्साहन देण्यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीने सणासुदीच्या काळात ऊर्जाबचत करणाऱ्या उपकरणांवर मोठी सूट जाहीर केली आहे. ब्युरो ऑफ एनर्जी एफिसियन्सी (बीईई) फाइव्ह स्टार रेटिंग असलेल्या सिलिंग फॅनवर ६० टक्क्यांपर्यंत, तर रेफ्रिजरेटरवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे वीजबचतीला चालना मिळणार आहे.

मुंबई उपनगरात वीज वितरण करणाऱ्या अदाणी इलेक्ट्रिसिटी ही योजना डिमांड साइड मॅनेजमेंट (डीएसएम) कार्यक्रमांतर्गत राबवत आहे. निवासी ग्राहक, शिक्षण संस्था, रुग्णालये आणि धर्मादाय ट्रस्ट यांना याचा लाभ घेता येणार आहे. यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीने बजाज, ऑटोमबर्ग या फॅन उत्पादक कंपन्यांशी आणि एलजी, लॉयड, गोदरेज, विजय सेल्स या फ्रिज कंपन्यांशी सहकार्य केले आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर आहे. आतापर्यंत २,४४३ फॅन आणि ४,७२२ फ्रिजचे वाटप झाले आहे. एकूण ५० हजार फॅन आणि २० हजार फ्रिज देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. हे फॅन सामान्य फॅनच्या तुलनेत ६५ टक्क्यांपर्यंत, तर फ्रिज ६० टक्क्यांपर्यंत वीजबचत करतात, असा दावा करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.