

भिवंडी, ता. ८ (बातमीदार) : वस्त्रोद्योगातील आर्थिक मंदी आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेली मोठी वाढ यांचा थेट फटका भिवंडीतील सायझिंग उद्योगाला बसला आहे. कुशल कामगारांची कमतरता, मजुरी दरात झालेली मोठी वाढ आणि सरकारी नियमांचे पालन करण्याची अनिवार्यता, यांसारख्या कारणांमुळे उत्पादन खर्च इतका वाढला आहे की, या उद्योगात काम करणे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक झाले आहे.
भिवंडी सायझिंग वेल्फेअर असोसिएशनची शुक्रवारी (ता. ६) एक विशेष बैठक पार पडली. ज्याला संघटनेचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. उद्योगाच्या सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा केल्यानंतर, दीर्घकालीन उपाय शोधण्याच्या उद्देशाने संघटनेने एकमताने निर्णय घेतला आहे. त्यानुसार, रविवारी (ता. ८) सकाळी ७ वाजल्यापासून भिवंडीतील संपूर्ण सायझिंग उद्योग अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. एका आठवड्यानंतर, संघटना पुन्हा एकत्र येऊन परिस्थितीचा आढावा घेईल. यावेळी सायझिंग दरांमध्ये वाढ करण्याबाबत आणि उद्योग पुन्हा सुरू की बंदच ठेवायचा, यावर निर्णय घेतला जाईल. एकदा का सकारात्मक तोडगा निघून उद्योग पुन्हा सुरू झाला, की सरकारी नियमांचे, जसे की अधिकृत इंधनाचा (उदा. कोळसा किंवा बायोफ्युएल) वापर यांचे पूर्णपणे पालन केले जाईल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष आणि बिंदू सायझिंगचे मालक अजय यादव यांनी दिली. दरम्यान, सायझिंग विभागात संप झाल्यास त्याचा थेट परिणाम पॉवर लूमवर होईल.
सायझिंग म्हणजे काय?
विशेष म्हणजे, पॉवरलूम क्षेत्रात धाग्याला अधिक बळकट करण्यासाठी सायझिंग प्रक्रिया वापरली जाते. यामध्ये धाग्यावर स्टार्च किंवा विशिष्ट रसायनांचे मिश्रण लावले जाते, ज्यामुळे धागा अधिक मजबूत आणि गुळगुळीत होतो. यामुळे विणकाम करताना धागा वारंवार तुटत नाही आणि तो घर्षणाला अधिक चांगल्या प्रकारे सहन करू शकतो, परिणामी पॉवरलूमवर कापड विणणे सोपे होते. सायझिंगचा मुख्य उद्देश धाग्याला मजबुती देऊन तो विणकामासाठी योग्य बनवणे हा आहे; यामुळे कापड उत्पादनादरम्यान धागे तुटण्याचे प्रमाण कमी होते आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.