

मुरबाड, ता. ९ (बातमीदार) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीचे पडसाद आता मुरबाडमध्येही उमटू लागले आहेत. दूध उत्पादकांनी निवडणुकीत दिलेला कौल डावलून सरकार नियुक्त सदस्यांच्या माध्यमातून सत्तेचे गणित बदलण्याचे प्रयत्न रोखावेत, या मागणीसाठी ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने मुरबाड तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष चेतन सिंह पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
दूध संघाची निवडणूक हरल्यानंतर नियमांमध्ये बदल करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न लोकशाहीला मान्य होणार नाही, अशी भूमिका चेतन सिंह पवार यांनी मांडली. यासंदर्भातील निवेदन तहसीलदारांमार्फत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला मतदारांनी बहुमत दिले आहे. मात्र, निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अधिकारांचा वापर करून नियमांमध्ये बदल केले. नामनिर्देशित सदस्यांची संख्या वाढवून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या माध्यमातून सत्तेचे गणित बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पवार यांनी केला. सरकारने हा निर्णय रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. या वेळी काँग्रेसचे मुरबाड तालुकाध्यक्ष अनिल चीराटे, कार्याध्यक्ष धनाजी बांगर, महिला तालुकाध्यक्ष संध्या कदम, जिल्हा समन्वयक भरत विशे, मुरबाड शहराध्यक्ष योगेश गुजर यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.