

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : आगीच्या दुर्घटना आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी रॉकेट व हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली असतानाही ठाण्यात या आदेशाला हरताळ फासण्यात येत आहे. बंदी आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यांवर रॉकेट आणि फटाके फोडणाऱ्या १० जणांविरोधात चितळसर, कापूरबावडी, कासारवडवली आणि वर्तकनगर पोलिसांनी कारवाई केली.
चितळसर पोलिसांनी पवारनगर येथील सिद्धाचल फेज सहा परिसरात रॉकेट फोडणाऱ्या पाच जणांवर कारवाई केली. यामध्ये वैष्णव मनेरा (वय २२), विशाल मौर्य (२५), भावेश मिनात (३१), अनिल गामी (३०) आणि मानस पासवान (२२) यांचा समावेश आहे. याशिवाय कापूरबावडी पोलिसांनी माजिवडा येथील लोढा क्राउन परिसरात तनिष भोईर (२०) आणि आशापुरा मंदिर परिसरात जिशान शेख (२२) यांच्यावर कारवाई केली. कासारवडवली पोलिसांनी हिरानंदानी इस्टेट येथील रिजेन्सी बिझनेस पार्क परिसरात आर्यन फुरसुुले (२१), तर आनंदनगर येथील विहंग व्हॅली परिसरात सप्तर्षी गुप्ता (३२) यांना फटाके फोडताना आढळल्याने कारवाई केली. दुसरीकडे, वर्तकनगर पोलिसांनी उपवन तलाव परिसरात रॉकेट फोडणाऱ्या बिपिन हरिजन (२९) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, ८ जानेवारी २०२७ पर्यंत सार्वजनिक व खासगी जागा, इमारतींच्या गच्च्या, बाल्कनी आणि रहिवासी परिसरात रॉकेट व तत्सम हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.