लोकशाहीसाठी विरोधाचा आवाज महत्त्वाचा : तुषार गांधी

लोकशाहीसाठी विरोधाचा 
आवाज महत्त्वाचा : तुषार गांधी
Published on: 

लोकशाहीसाठी विरोधाचा
आवाज महत्त्वाचा : तुषार गांधी
मुंबई, ता. १८ : सरकारला प्रश्न विचारणे, सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीका करणे आणि अन्यायाविरोधात शांततापूर्ण आंदोलन करणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नव्हे, तर असहमती व्यक्त करण्याचे आणि विरोध करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे लोकशाही सक्षम ठेवायची असेल, तर अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि विरोधाच्या अधिकाराचे संरक्षण झाले पाहिजे, असे ठाम प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले.
मुंबई प्रेस क्लब येथे बुधवारी (ता. १८) ‘दि राईट टू डिसेंट - नो कॉम्प्रमाईज, डेमोक्रसी जिंदा है’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन आणि विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. पुस्तकाचे लेखक बी. एन. कुमार यांच्यासह तुषार गांधी, रिया अहिर, फिरोज मिठीबोरवाला, अयाज मेमन, भारद्वाज आणि पत्रकार विवेक अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी तुषार गांधी यांनी शांततापूर्ण आंदोलनांवरील निर्बंधांबाबत चिंता व्यक्त केली.
सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिकांकडे संशयाने पाहिले जाते. आंदोलनकर्त्यांवर परकीय शक्तींशी संबंध असल्याचे आरोप केले जातात; मात्र सरकारला जाब विचारणे हा गुन्हा नाही. स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांनी सत्याग्रह आणि सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून अन्यायाविरोधात लढा दिला. आज त्याच शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारावर निर्बंध आणले जात असल्याची विसंगती दिसून येते, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.