नेरुळमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

नेरुळमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
Published on

नेरूळमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
१२ वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका; तिघांना अटक

नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने नेरूळमधील शिरवणे गाव परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी ठेवण्यात आलेल्या अवघ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसह एका पीडितेची सुटका करण्यात आली. तसेच लॉजमधील दोन मॅनेजर आणि एका वेटरसह तिघांना अटक करण्यात आली.
नेरूळमधील शिरवणे गाव येथील कोहिनूर पॅलेस लॉजिंग अँड बोर्डिंग येथे मुली व महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यानुसार ३ सप्टेंबरला माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला संबंधित लॉजमध्ये पाठविले. या वेळी लॉजमधील मॅनेजर आणि वेटर्सने बनावट ग्राहकाकडून वेश्यागमनासाठी चार हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर पथकाने लॉजवर छापा टाकला. या वेळी लॉजमध्ये दोन महिला वेश्याव्यवसायाठी ठेवण्यात आल्याचे आणि दोन पीडित महिलांपैकी एक १२ वर्षीय अल्पवयीन असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी दोघींचीही सुटका केली. या प्रकरणात मॅनेजर हृदयकुमार महेश सिंग, मॅनेजर दीपक जीवनदास रामरखियानी आणि वेटर कुलेश्वर कुमार सिंग यांना धीरू आणि दिनेश या दोघांनी अल्पवयीन मुलगी व पीडित महिलेला वेश्याव्यवसायाठी पाठवल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लॉजमधील मॅनेजर आणि वेटर्स या तिघांना ४ सप्टेंबरला अटक केली. न्यायालयाकडून त्यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील धीरू आणि दिनेश या दोन फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com