संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एमपीएससी सचिवांच्या तोंडाला फासले काळे तिघा कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एमपीएससी सचिवांच्या तोंडाला फासले काळे   तिघा कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक
Published on

एमपीएससीच्या सचिवांना फासले काळे
संभाजी ब्रिगेडच्या तीन कार्यकर्त्यांना अटक
नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सचिवांना शुक्रवारी काळे फासण्यात आले. बेलापूर येथील मुख्य कार्यालयात पेपरफुटीसंदर्भातील पुराव्यांवर चर्चा करण्याच्या बहाण्याने संभाजी ब्रिगेडच्या तीन कार्यकर्त्यांनी सचिवांच्या कार्यालयात घुसून महेंद्र हरपळकर यांच्या अंगावर आणि तोंडावर काळी पावडर फासली. याप्रकरणी सीबीडी पोलिसांनी तिघांना अटक केली.
काही पुरावे सादर करण्यासाठी श्रीकृष्ण ऊर्फ अण्णासाहेब आदिनाथ सावंत (५०), सुहास लक्ष्मण राणे (५९) योगेश शांतीलाल पाटील (३४) हे सचिवांना भेटण्यासाठी गुरुवारी गेले होते. याच पुराव्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी तसेच पुस्तके भेट देण्यासाठी त्यांनी शुक्रवारी पुन्हा सचिवांची वेळ घेतली होती. ठरलेल्या वेळेनुसार दुपारी तिघेही कार्यालयात दाखल झाले. सचिवांना काही पुस्तके भेट देण्याच्या आणि पुरावे दाखविण्याच्या बहाण्याने ते त्यांच्या अगदी जवळ गेले आणि अचानक सोबत आणलेली काळ्या रंगाची पावडर त्यांच्यावर फेकली. तुम्हीच लोक पेपर फोडण्यात सामील आहात, तुम्हाला फोडून काढले पाहिजे, असे बोलून हरपाळकर यांना धक्काबुक्की केली. तसेच व्हिडिओ चित्रीकरण केले. या प्रकारामुळे कार्यालयात एकच तारांबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सीबीडी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com