मॉडेलिंग करणाऱया तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी विवाहित प्रियकरावर गुन्हा दाखल! पत्नीचा दर्जा न देता शारीरिक व मानसिक छळ करुन पैशांसाठी मारहाण केल्याचा आरोप

मॉडेलिंग करणाऱया तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी विवाहित प्रियकरावर गुन्हा दाखल!   पत्नीचा दर्जा न देता शारीरिक व मानसिक छळ करुन पैशांसाठी मारहाण केल्याचा आरोप
Published on

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
पनवेल, ता. १७ (वार्ताहर) : मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या २६ वर्षीय कंचन कश्यप हिच्या मृत्यू प्रकरणाला काही महिन्यांनंतर धक्कादायक वळण मिळाले आहे. कंचनच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट्स, विवाह प्रमाणपत्र आणि अन्य कागदपत्रांवरून तिच्या छळाची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांनी जितेश कदम याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कंचन कश्यप मूळची दिल्ली येथील रहिवासी असून, मॉडेलिंगसाठी पाच वर्षांपूर्वी मुंबईत आली होती. पनवेल परिसरात राहून ती मॉडेलिंगचे काम करत होती. १७ जानेवारी रोजी कंचन हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर कुटुंबीयांनी कंचनच्या मोबाईलची तपासणी केली असता जितेश कदम नामक तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. याशिवाय, मुंबई पालिकेचे २५ मे २०२३ रोजीचे एक विवाह प्रमाणपत्रदेखील मोबाईलमध्ये आढळून आले. यावरुन जितेश कदम याने आधीच विवाहित असतानासुद्धा कंचनसोबत विवाह केल्याचे स्पष्ट झाले. जितेश हा कंचनला पत्नीचा दर्जा देत नव्हता. उलट, तिच्या कमाईतील पैशांची मागणी करून तिला मारहाण व शिवीगाळ करत होता. दरम्यान, मोबाईलमधील पुरावे, व्हॉट्सॲपमधील चॅट्स, भाडेकरार आणि इतर कागदपत्रांची खात्री पटल्यानंतर मृत कंचनच्या आईने पनवेल शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com