

महाविद्यालयीन तरुणांना मारहाण करून लुटले
नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : मुंबईतील घाटकोपर येथून किल्ले गावठाणच्या समुद्रकिनारी सूर्योदय पाहण्यासाठी आलेल्या चार महाविद्यालयीन तरुणांना चौघा अज्ञात लुटारूंनी मारहाण करून लुटल्याची घटना शुक्रवारी (ता. ३) सकाळी घडली. लुटारूंनी तरुणांकडील तीन महागडे फोन, रोकड, ऑनलाइन पैसे तसेच सुमारे एक लाख रुपये किमतीची दुचाकी असा एकूण दोन लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी चौघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे.
अर्णव मनोज (२१) हा घाटकोपर येथे राहणारा महाविद्यालयीन विद्यार्थी असून, तो तीन मित्रांसह किल्ले गावठाण येथे आला होता. अर्णव, प्रणव मनीष (१९), प्रणाश श्रीकृष्ण शेट्टी (२२) आणि ध्रुवकुमार लग्वाणी (२२) हे २ ऑक्टोबरला पहाटे दोन मोटारसायकलींवरून समुद्रकिनाऱ्यावरील रेल्वे पटरी परिसरात सूर्योदय पाहण्यासाठी आले होते. चौघे रेल्वे पुलावरील पटरीवर फेरफटका मारत असताना पुलाखालील मोकळ्या जागेत चार तरुण बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही वेळाने या चौघा लुटारूंनी तरुणांना अडवून त्यांच्याशी हुज्जत घातली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने रेल्वे पटरीवर झोपवून त्यांच्या मोबाईलचे पासवर्ड घेतले. अर्णवच्या मोबाईलमधून ऑनलाइन १० हजार रुपये, तर प्रणवच्या मोबाईलमधून पाच हजार रुपये घेतले. तसेच दुचाकींच्या चाव्या काढून घेत त्यांना तेथेच बसण्यास सांगितले. खाली आल्यास मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर लुटारू पसार झाले. घटनेनंतर तरुणांनी कुटुंबीयांशी संपर्क साधून एनआरआय पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.