वाशीतील फिनटेक कंपनीला सायबरचा फटका

वाशीतील फिनटेक कंपनीला सायबरचा फटका
Published on: 

वाशीतील फिनटेक कंपनीवर सायबर हल्ला
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : वाशी रेल्वे कमर्शियल कॉम्प्लेक्समधील व्हीके व्हेंचर प्रा. लि. या फिनटेक कंपनीच्या आर्थिक प्रणालीवर सायबर हल्ला करून चोरट्यांनी अवघ्या ९४ मिनिटांत एक कोटी ९८ लाख २९ हजार रुपये लंपास केले. शुक्रवारी (ता. २) सकाळी १०.१९ ते ११.५३ या वेळेत ५७ अनधिकृत आर्थिक व्यवहारांद्वारे ही रक्कम देशभरातील विविध बँक खात्यांमध्ये वळविण्यात आली. याप्रकरणी नवी मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वाशी रेल्वे कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये या कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. कंपनीच्या ‘बिजनेक्स्ट’ पोर्टलद्वारे देशभरातील सुमारे पाच लाख नोंदणीकृत किरकोळ विक्रेत्यांना आधार सक्षम पेमेंट प्रणालीच्या माध्यमातून रोख रक्कम वितरणासह विविध आर्थिक व्यवहारांच्या सुविधा पुरवल्या जातात. यासाठी कंपनीचे वाशी येथील येस बँकेत चालू खाते आहे. शुक्रवारी सकाळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी किरकोळ विक्रेत्यांचे दैनंदिन व्यवहार होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर संचालक विनय केडिया यांनी आर्थिक प्रणाली तपासली असता, मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यवहार झाल्याचे आढळले. वैध वापरकर्ता तपशील किंवा अधिकृत ओटीपीची संमती न घेता प्रणालीला बगल देऊन ही रक्कम वळविण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com