छत्रपतींचा जिरेटोप मोदींना शोभणारा नाही

छत्रपतींचा जिरेटोप मोदींना शोभणारा नाही

छत्रपतींचा जिरेटोप मोदींना शोभणारा नाही
उद्धव ठाकरे, नाशिकच्या जाहीर सभेत हल्लाबोल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये, असे सक्त आदेश मावळ्यांना देणारे छत्रपती शिवाजी महाराज कोठे?, तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने त्यांना प्रश्‍न विचारणाऱ्या शेतकऱ्याला अडवणारे हुकूमशाह नरेंद्र मोदी कोठे?, असा सवाल करत मोदींनी छत्रपतींची बरोबरी करू नये, त्यांना जिरेटोप शोभत नाही ती त्यांची लायकीदेखील नाही, अशी बोचरी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. नरेंद्र मोदींना जिरेटोप घालणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांनीदेखील शिवरायांचा इतिहास समजून घेण्याचा यावेळी त्यांनी सल्ला दिला. त्याचबरोबर छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात गुडघे टेकवायला लावू, असा थेट इशाराच त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची आज (ता. १५) जाहीर सभा झाली. त्यावेळी ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर शाब्दिक हल्ला चढविला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववादी शिवसेनेची धुरा माझ्याकडे सोपविली, त्यामुळे नकली कोण हे जनतेला चांगलेच माहीत आहे. त्या उलट भाजप हाच नकली पक्ष असून दुसऱ्यांचे नेते पळवायचे व आपली पोरं म्हणून दाखवण्याचे काम भाजपचे असल्याचेही त्यांनी म्हटले.

----------
गद्दारांना ५० खोके, शेतकऱ्यांना काय?
मोदींनी कांद्यावरून महाराष्ट्र व गुजरात भेद केला आहे, गुजरातच्या कांद्यावरील त्यांनी बंदी उठवली, गद्दारांना ५० खोके दिले, मग शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव का देत नाहीत, असा सवाल करत आता शेतकऱ्यांची ताकद दाखविण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी म्हटले. मोदी-शहा हेच महाराष्ट्रातील गद्दारीचे खरे सूत्रधार असल्याचाही घणाघात त्यांनी केला.
----------------
नाशिकच्या बॅगांचे उत्तर द्या
नाशिकमध्ये हेलिकॉप्टरमधून बॅगा भरून माल आणल्याचा व्हिडीओ राऊत यांनी सोशल मीडियावर टाकला होता. त्यावर हा माल कोठून आला, याचे उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी देण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.
------------------------
फोटो- ३०४२१ ३०४०५,०६,०७, ०९,१०,११,१३,१४,१५, १७,१८,१९)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com