शाश्वत जीवनशैलीसाठी नैसर्गिक शेती आवश्यक
शाश्वत जीवनशैलीसाठी नैसर्गिक शेती आवश्यक
बदलापूर, ता. १५ : जीवनध्येय ठरवणे, जीवनदृष्टी बाळगणे आणि त्यानुसार जीवनशैली अनुसरणे हे शाश्वत समाधानासाठी आवश्यक आहे. त्याच पद्धतीने नैसर्गिक शेती ही केवळ पीकपद्धती नाही, तर जीवनदृष्टी आणि जीवनशैली आहे, असे मत पर्यावरणपूरक जीवनशैलीचे पुरस्कर्ते दिलीप कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
सकाळ प्रकाशन प्रकाशित आणि कृषिभूषण राजेंद्र भट लिखित ‘शाश्वत नैसर्गिक शेती’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ व शाश्वत जीवनशैली परिसंवाद ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील बेंडशिळ येथील निसर्गमित्र भटवाडी येथे झाला. याप्रसंगी आयोजित परिसंवादात कुलकर्णी बोलत होते. मनोहर खके, वैद्य संतोष सूर्यवंशी, डॉ. नामदेव म्हसकर, रमेश साठे, विनय महाजन, अजित गोखले, रघुनंदन चुरी आणि सकाळ प्रकाशनचे सरव्यवस्थापक आशुतोष रामगीर, कार्यकारी संपादक दीपाली चौधरी आदी उपस्थित होते.
परिसंवादात मान्यवरांनी नैसर्गिक शेतीची उपयुक्तता, जमिनीची सुपीकता, अन्नसुरक्षा आणि पर्यावरणीय संतुलनाबाबत आपले विचार मांडले. हे पुस्तक शेतकरी, संशोधक, पर्यावरण अभ्यासक तसेच ग्रामीण विकास कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
लेखक राजेंद्र भट हे तीन दशकांपासून सेंद्रिय व नैसर्गिक शेती पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. बहुपीक, बहुस्तरीय शेतीच्या संकल्पना आणि निसर्गाशी सुसंगत जीवनपद्धतींची मूलतत्त्वे मांडून त्याचा सखोल ऊहापोह त्यांनी पुस्तकात केला आहे.
पुस्तकाविषयी
पुस्तक : शाश्वत नैसर्गिक शेती
लेखक : राजेंद्र भट
पृष्ठे : १२८, किंमत : २४०
संपर्क : ९८८१५९८८१५ व ८८८८८४९०५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.