रिअल इस्टेट एजंटसाठी 
डिजिटल मार्केटिंग

रिअल इस्टेट एजंटसाठी डिजिटल मार्केटिंग

Published on

रिअल इस्टेट एजंटसाठी डिजिटल मार्केटिंग
पुणे, ता. २८ : खास रिअल इस्टेट एजंटसाठी केंद्रित २० तासांची डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजिली आहे. रिअल इस्टेट एजंटना स्वतःच्या अथवा ते ज्या बांधकाम व्यवसाय कंपनीसाठी काम करतात, त्यांच्या व्यवसायाचे मार्केटिंग करायचे असेल तर आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग एवढे प्रभावी मार्केटिंग तंत्र उपलब्ध नाही. कोणत्याही कंपनीच्या किंवा संस्थेच्या प्रगतीत मार्केटिंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कंपनीचे उत्पादन विकण्यासाठी हे डिजिटल मार्केटिंगचे तंत्र कसे वापरावे तसेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग अशा विविध तंत्रांचा उपयोग डिजिटल मार्केटिंग कसे करावे याचे प्रगत मार्गदर्शन प्रात्यक्षिकासहित कार्यशाळेत होणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ४,९९९ रुपये अधिक जीएसटी.
संपर्क : ८४८४८२२८५५, ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२


बांधकाम व्यवसाय पर्यवेक्षक प्रशिक्षण
स्थापत्य अभियांत्रिकीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली व्यक्तीही योग्य प्रशिक्षणानंतर बांधकाम उद्योगात आपला व्यवसाय सुरू करू शकते अथवा करिअर घडवू शकते. या पार्श्वभूमीवर ३० दिवसांचे प्रगत बांधकाम पर्यवेक्षक (कन्स्ट्रक्शन सुपरवायजर) प्रशिक्षण १ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. यामध्ये बांधकाम उद्योगात नोकरी मिळण्याची शक्यता वाढवणारे, स्थापत्य अभियांत्रिकीचे प्रगत ज्ञान देणारे, प्रात्यक्षिकावर आधारित प्रशिक्षण देणार आहे. बांधकाम क्षेत्राचा परिचय, बांधकाम साहित्याचा परिचय, रेखाचित्राचे वाचन व प्रत्यक्ष साइटवर त्याचा सराव, क्षेत्र भेटी, प्रकल्प पूर्वतयारी, कंत्राटदाराच्या कामाची पद्धत, अंदाज व खर्च नियोजन, बांधकाम उद्योगातील १४ महत्वाच्या पायऱ्या, सुरक्षिततेसाठी घ्यायची खबरदारी व वेळेचे व्यवस्थापन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९८८१०९९७५७

सरकारी इस्टिमेशन प्रशिक्षण
शासकीय कामांचे मूल्यनिर्धारण, इस्टिमेशन हे बांधकाम, स्थापत्य विभागातील कंत्राटदार, विद्यार्थी तसेच अभियंता, पर्यवेक्षक व शासकीय अधिकारी यांना उपयुक्त असे ऑनलाइन प्रशिक्षण ६ ऑक्टोबरला आयोजिले आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभाग, एसएसआर, रेट, नियमावली, टेस्टिंग, व्यवस्थापन पत्रक, रेट तपासणी, चार्ट, इस्टिमेशन सॉफ्टवेअर व इस्टिमेशन बनविणे, समाजमंदिर, सभामंडप, शाळा, अंगणवाडी, सुरक्षा भिंत अशा प्रकारचे कामे व इस्टिमेशन आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. या प्रशिक्षणामुळे सहभागींना प्रत्यक्ष कामकाजातील कौशल्य, खर्च नियंत्रण आणि तांत्रिक ज्ञान अधिक प्रभावीरीत्या आत्मसात करण्यास मदत होईल.

अन्नसेवा उद्योग कार्यशाळा
अन्नसेवा उद्योगातील उद्योजक, हॉटेल/रेस्टॉरंट मालक आणि नवउद्योजकांसाठी ऑनलाइन कार्यशाळा ११ ऑक्टोबरपासून आयोजिली आहे. यामध्ये हॉटेल, कॅफे, क्लाउड किचन व ढाबा व्यवसायाचे नियोजन, ब्रँडिंग, स्थान धोरण, कर्मचारी धोरण, किचन व फ्लोअर व्यवस्थापन, विपणन व ग्राहक व्यवहारांविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. पारंपरिक व आधुनिक व्यवसायातील बदल, तंत्रज्ञानाचा वापर, खर्चाचे नियोजन व शाश्वत व्यवसाय प्रारूप तयार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच हॉटेल/रेस्टॉरंट व्यवसाय सुरू करताना आवश्यक २१ महत्त्वाचे टप्पे, क्लाउड किचन, स्विगी व झोमॅटोची कार्यप्रणाली, कमिशन व नफा वाढीचे तंत्र, फूड स्टॉल्स, ढाबा व कॅफे आदींद्वारे स्थानिक स्तरावर प्रभावी व्यवसाय कसा उभारायचा, स्टाफिंग, किचन लेआउट, पीओएस प्रणाली, इन्व्हेंटरी व फायनान्स नियोजन, फ्रँचायझी मॉडेल आदींबाबतही मार्गदर्शन होणार आहे. फूड इंडस्ट्रीत स्वतःचा ठसा उमटवू इच्छिणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची संधी आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com