व्यावसायिक मिलेट्स प्रक्रिया कार्यशाळा
व्यावसायिक मिलेट्स प्रक्रिया कार्यशाळा
पुणे, ता. १ ः आहार व आरोग्यविषयक जागरूकता वाढल्याने भरडधान्ये (मिलेट्स) आता ताटात दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर भरडधान्यांवर प्रक्रिया करून विविध नावीन्यपूर्ण पदार्थ तयार करण्याविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा ४ व ५ ऑक्टोबर रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत मिलेट्स म्हणजे काय, महत्त्व, उपयुक्तता, सध्या असणारी गरज व मागणी, पोषक गुणधर्म याबाबत माहिती दिली जाणार आहे. पराठा, उपमा, लापशी, खीर, पीठ, लाडू, नमकीन, पुलाव, इडली, डोसा, कुकीज, ढोकळा, स्वीट व बर्फी, प्रोटिन पावडर, चिवडा इत्यादी मिलेट्सचे विविध पदार्थ शिकविण्यात येतील. मिलेट व्यवसायाला असणारे महत्त्व, पॅकिंग, ब्रॅंडिंग, लागणारी मशिनरी, प्रकल्प, उत्पादन व बाजार खर्च, विक्रीच्या पद्धती आदींबाबतही मार्गदर्शन होणार आहे.
BPMS पोर्टल ऑनलाइन प्रशिक्षण
आजच्या डिजिटल युगात बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया अधिक वेगवान व पारदर्शक झाली आहे. अशा वेळी BPMS पोर्टल व PREDCR प्रणाली समजून घेणे हे वास्तुविशारद, स्थापत्य अभियंते व नगर नियोजकांसाठी अत्यावश्यक झाले आहे. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणारे BPMS पोर्टल ऑनलाइन प्रशिक्षण हे व्यावसायिक कौशल्य वाढवण्याची उत्तम संधी आहे. केवळ एका महिन्यात UDCPR नियोजन नियम, बिल्डिंग परमिशन प्रक्रिया, योग्य ड्रॉइंग सबमिशनसाठी स्किल्स आणि PREDCR टेस्टिंग यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रभुत्व मिळविणे शक्य आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन महिन्यांसाठी व्हॉट्सॲप साहाय्य, रेकॉर्ड केलेल्या सत्रांना आजीवन प्रवेश, टीपी क्लायंट सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.
सरकारी इस्टिमेशन प्रशिक्षण
शासकीय कामांचे मूल्यनिर्धारण, इस्टिमेशन हे बांधकाम, स्थापत्य विभागातील, कंत्राटदार, विद्यार्थी तसेच अभियंता, पर्यवेक्षक व शासकीय अधिकारी यांना उपयुक्त असे ऑनलाइन प्रशिक्षण सहा ऑक्टोबर रोजी आयोजिले आहे. प्रशिक्षणात सार्वजनिक बांधकाम विभाग, एसएसआर, रेट, नियमावली, टेस्टिंग, व्यवस्थापन पत्रक, रेट तपासणी, चार्ट, इस्टिमेशन सॉफ्टवेअर व इस्टिमेशन बनविणे, तयार करणे, समाज मंदिर, सभामंडप, शाळा, अंगणवाडी, सुरक्षा भिंत अशा प्रकारची कामे व इस्टिमेशन आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. या प्रशिक्षणामुळे सहभागींना प्रत्यक्ष कामकाजातील कौशल्य, खर्च नियंत्रण आणि तांत्रिक ज्ञान अधिक प्रभावीरीत्या आत्मसात करण्यास मदत होईल.
मेडिकल कोडिंग प्रमाणपत्र प्रशिक्षण
वैद्यकीय क्षेत्रात करिअरसाठी मेडिकल कोडिंग या तीन महिन्यांचे प्रमाणपत्र प्रशिक्षण ‘एसआयआयएलसी’ व टेक महिंद्रा यांच्या वतीने २५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यामध्ये सीपीसी (सर्टिफाइड प्रोफेशनल कोडर) प्रमाणपत्र तयारीचे मार्गदर्शन तसेच ‘केपीओ’ (नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग) व ‘बीपीओ’साठीचे (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) मार्गदर्शन होणार आहे. मेडिकल शब्दावलीची ओळख, मेडिकल सेवा भाषेची समज, शरीर विज्ञान आणि शारीरिक रचना, कोडिंग प्रणाली : आयसीडी-१०, सीपीटी आणि एचसीपीसीएस कोडिंग, वैद्यकीय सेवा नियमावली (एचआयपीएए), कोडिंग नियम व मार्गदर्शक तत्त्वे, कोडिंग सराव आदींचा समावेश आहे. सायन्स विषयातील २१ ते २५ वयोगटातील पदवीधारक, व्यावसायिक, मेडिकल कोडिंगमध्ये करिअर करू इच्छिणारे प्रवेशास पात्र आहेत.
‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२
क्यूआर कोड :
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.