इन्स्टंट मसाले व प्रीमिक्स कार्यशाळा

इन्स्टंट मसाले व प्रीमिक्स कार्यशाळा

Published on

सध्याच्या धावपळीच्या युगात इन्स्टंट फूडला बाजारपेठेमध्ये खूप मागणी आहे. हे लक्षात घेऊन इन्स्टंट मसाले, प्रीमिक्स व चटणी तयार करण्यास शिकवणारी दोनदिवसीय प्रात्यक्षिकांवर आधारित कार्यशाळा १५ नोव्हेंबरपासून आयोजिली आहे. रेडी टू कुक मसाले आणि ग्रेव्ही यामध्ये इन्स्टंट पनीर मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मिसळ मसाला, महाराष्ट्रीय ग्रेव्ही, हैदराबादी ग्रेव्ही, व्हाइट ग्रेव्ही, मालवणी ग्रेव्ही, फिश फ्राय मसाला, चायनीज ग्रेव्ही, जैन स्पेशल ग्रेव्ही, चायनीज ग्रेव्ही हे पदार्थ शिकवले जातील. इन्स्टंट रेडी टू कुक मसाले व नावीन्यपूर्ण ग्रेव्ही यामध्ये इन्स्टंट पीठे व प्रीमिक्स शिकवले जातील ज्यामध्ये डोसा, इडली, गुलाब जामुन, आइस्क्रीम, ढोकळा, रबडी, शाही खीर, मसालेभात दाल खिचडी, थालीपीठ, चकली भाजणी हे पदार्थ शिकवले जातील.

बांधकाम व्यवसाय पर्यवेक्षक प्रशिक्षण
स्थापत्य अभियांत्रिकीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली व्यक्तीही योग्य प्रशिक्षणानंतर बांधकाम उद्योगात आपला व्यवसाय सुरू करू शकते अथवा करिअर घडवू शकते. या पार्श्वभूमीवर तीस दिवसांचे प्रगत बांधकाम पर्यवेक्षक (कन्स्ट्रक्शन सुपरवायझर) प्रशिक्षण २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यामध्ये बांधकाम उद्योगात नोकरी मिळण्याची शक्यता वाढवणारे, स्थापत्य अभियांत्रिकीचे प्रगत ज्ञान देणारे, प्रात्यक्षिकांवर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्राचा परिचय, बांधकाम साहित्याचा परिचय, रेखाचित्राचे वाचन व प्रत्यक्ष साइटवर त्याचा सराव, क्षेत्र भेटी, प्रकल्प पूर्वतयारी, कंत्राटदाराच्या कामाची पद्धत, अंदाज व खर्च नियोजन, बांधकाम उद्योगातील १४ महत्त्वाच्या पायऱ्या, सुरक्षिततेसाठी घ्यायची खबरदारी व वेळेचे व्यवस्थापन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.

डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण
निर्जलीकरण व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण थेट निर्जलीकरण उद्योग प्रकल्पात २२ व २३ नोव्हेंबर रोजी आयोजिले आहे. प्रशिक्षणात निर्जलीकरण म्हणजे काय, या तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, निर्जलीकरणासाठीचे प्रमुख घटक, वेगवेगळ्या पद्धती, निर्जलीकरणाद्वारे तयार होणारे घटक पदार्थ व त्याचे उपयोग, उत्पादन व बाजारातील किंमत, निर्जलीकरणासाठी लागणाऱ्या मशिनरी, त्याचा फ्लो चार्ट, उपलब्ध बाजारपेठ, विपणन पद्धती, शासकीय योजना व अनुदान, प्रकल्प उभारण्यासाठी जागेची निवड, अंदाजे गुंतवणूक, प्रकल्प अहवाल इ.विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी, चिकन या पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे.
‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com