ग्रामस्तरावरील व्यवसाय विकास प्रशिक्षण
ग्रामस्तरावरील व्यवसाय विकास प्रशिक्षण
पुणे, ता. २३ : शेतमाल व अन्न प्रक्रिया, कुटिरोद्योग, गृहोद्योग, स्थानिक नैसर्गिक संसाधनांवरील प्रक्रियाआधारित उद्योग अशा विविध प्रकारचे उद्योग व व्यवसाय करण्यासाठी गावातील होतकरू, उद्यमशील युवावर्ग, महिला, शेतकरी यांना गावामध्येच ग्रामपंचायत किंवा स्थानिक संस्थांच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासाठी सकाळ-ॲग्रोवनची प्रशिक्षण संस्था असलेल्या सिमासेस लर्निंगद्वारे (SIILC) प्रशिक्षण सेवा उपलब्ध केली जाते. आपल्या गावामध्ये अशा प्रकारचे व्यवसाय विकास प्रशिक्षण आयोजित करण्याची तयारी असलेल्या ग्रामपंचायतींनी तसेच स्थानिक संस्थांनी सिमासेस लर्निंगकडे संपर्क साधावा.
संपर्क : ८९५६७१२६३१
यूट्युबर होण्यासाठी प्रमाणपत्र प्रशिक्षण
‘बिकम अ सर्टिफाईड यूट्युबर’ ही चार दिवसांची कार्यशाळा २७ व २८ डिसेंबर तसेच ३ व ४ जानेवारी रोजी आयोजिली आहे. ज्यांना यूट्युब व इतर माध्यमांद्वारे कंटेंट क्रिएटर व्हायचे आहे अथवा जे आधीच असे क्रिएटर आहेत त्यांना स्वतःची पोहोच वाढवायची आहे, अशांना ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. वास्तविक उदाहरणे, प्रात्यक्षिकाद्वारे शिकवण्यावर असलेला भर आणि ‘एआय’चा उपयोग हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे. यूट्युबद्वारे कमाई, चॅनेल कसे तयार करावे, कथा व पटकथा यांचे लेखन कसे करावे, कॅमेरा, ध्वनी, प्रकाशयोजना आणि संकलनाचे तंत्र वापरून चांगला कंटेंट कसा तयार करता येईल याचे उपयुक्त मार्गदर्शन कार्यशाळेत होणार आहे. सोबतच यूट्युब विश्लेषण, लघुपट निर्मिती, निर्मितीपूर्व कामे, निर्मितीनंतरची कामे, मार्केटिंग, एसईओ व अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे विविध तांत्रिक मार्ग, हक्क आणि कायदेशीर बाबी आदींबद्दलही मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२
शासकीय ई-निविदा प्रक्रिया प्रशिक्षण
विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्वस्त संस्था, देवस्थाने आता ई-निविदा प्रक्रिया राबवत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे १० दिवस चालणारे ऑनलाइन प्रशिक्षण ५ जानेवारीपासून सुरू होत आहे. प्रशिक्षणात विविध विभागांतील नोंदणी, न दिसणाऱ्या निविदासुद्धा कशा शोधायच्या, बीओक्यू भरताना येणाऱ्या अडचणी, निविदा प्रक्रियेला लागणारी कागदपत्रे, कागदपत्रे डिजिटली सही करून कशी सादर करायची, ईएमडी व एसडीमध्ये सूट कशी मिळवायची, स्वतःकडे यंत्रे व साहित्य नसतील तर करावयाचे भाडे करार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी करावयाच्या १५ महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या याबाबत तसेच इतर महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७
आयुर्वेदिक अभ्यंग मसाज कार्यशाळा
मसाज अथवा आयुर्वेदिक अभ्यंग केल्याने आरोग्यासंबंधी तक्रारी दूर होतात व वात-पित्त-कफाचे संतुलन राखले जाते. आरोग्याच्या जागृतीमुळे गेल्या काही वर्षांत सतत वाढत असणाऱ्या या क्षेत्रात तज्ज्ञ व्यावसायिकांची मागणी आहे. याबाबत मार्गदर्शन करणारी तीनदिवसीय कार्यशाळा ९, १० व ११ जानेवारी रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत अभ्यंग मर्दन संकल्पना, मसाजचे तंत्र, मंत्र व शास्त्र, मसाजचे फायदे, वात-पित्त-कफ प्रवृतीनुसार मसाज, उपयुक्त औषधी तेले, शिरोभ्यंग, पादाभ्यंग, विविध स्ट्रोक्स, स्नेहन, स्वेदन, पावडर मसाज, उदवर्तन, मसाज केव्हा, कधी किती वेळ करावा, कधी करू नये याबाबत प्रात्यक्षिकासाहित मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२

