एसआयआयएलसी

एसआयआयएलसी

Published on

राजकीय नेतृत्व विकास कार्यशाळा
आज अनेक युवक राजकारणात सक्रिय होत आहेत; मात्र नेतृत्व कौशल्य व राजकीय समज नसल्यामुळे त्यांची प्रगती खुंटते. ही गरज ओळखून राजकीय नेतृत्व विकास या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन २३ व २४ ऑगस्टला करण्यात आले आहे. कार्यशाळेत मतदारसंघ विश्लेषण, सर्व्हे, प्रचार योजना, टीम उभारणी, जनसंपर्क, मीडिया हाताळणी, वॉर रूम व्यवस्थापन आणि निवडणूक रणनीती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राजकारणात पदार्पण करू इच्छिणाऱ्या किंवा आधीच कार्यरत असलेल्या उमेदवारांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे. अनुभवी राजकीय विश्लेषक, निवडणूक शास्त्रज्ञ व प्रचारकांचे मार्गदर्शन लाभणार असून, ही संधी दीर्घकालीन राजकीय यशासाठी महत्त्वाची ठरू शकते.
संपर्क : ८४८४८११५४४

यूट्युब कंटेंट क्रिएटर होण्याची संधी
‘यूट्युब कंटेंट क्रिएटर विथ एआय’ ही चार दिवसांची कार्यशाळा २३, २४, ३० व ३१ ऑगस्टला होणार आहे. ज्यांना यूट्युब व इतर माध्यमांद्वारे कंटेंट क्रिएटर व्हायचे आहे, अथवा जे आधीच असे क्रिएटर आहेत, त्यांना स्वतःची पोहोच वाढवायची आहे, अशांना ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. वास्तविक उदाहरणे, प्रात्यक्षिकाद्वारे शिकवण्यावर असलेला भर हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे. कार्यशाळेत यूट्युबद्वारे कमाई कशी करता येते, याबद्दल संपूर्ण माहिती, स्वत:चे चॅनेल कसे तयार करावे, कथा व पटकथा यांचे लेखन कसे करावे, चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी कॅमेरा, ध्वनी, प्रकाशयोजना आणि संकलनाचे तंत्र वापरून चांगली सामग्री कशी तयार करता येईल, कंटेंट निर्मितीमध्ये एआयचा रोल व कंटेंट निर्मितीसाठी कोणती एआय साधने वापरावीत, याचे उपयुक्त मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

कृषी, अन्न प्रक्रिया करिअरवर मार्गदर्शन
पदवीधर तरुणांसाठी करिअरच्या नव्या वाटा खुली करणारी एक खास संधी उपलब्ध झाली आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे कृषी, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय करिअर आणि स्पर्धा परीक्षांसंदर्भात विनामूल्य ऑनलाइन चर्चासत्र व मार्गदर्शन सत्रांचे २३ ते ३१ ऑगस्टदरम्यान सायंकाळी पाच ते सात या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. कृषीसंबंधित उद्योग-स्टार्टअप या विषयावर अक्षय घोरपडे (२३ ऑगस्ट), अन्न प्रक्रिया उद्योग संधी या विषयावर गंधाली दिंडे (२४ ऑगस्ट), आंतरराष्ट्रीय भाषा व करिअर संधी या विषयावर दीपक पागे (३० ऑगस्ट) आणि स्पर्धा परीक्षा व कृषी पदवीधरांसाठी शासकीय नोकरीच्या संधी या विषयावर राहुल खरटमल (३१ ऑगस्ट) हे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. या सर्व सत्रांना उपस्थित राहण्यासाठी नोंदणी आवश्यक असून प्रवेश मर्यादित आहेत. कोणत्याही क्षेत्रातील २१ ते २६ वयोगटातील पदवीधर यासाठी पात्र आहेत.
संपर्क : ९८८१०९९४२६, ८४८४८२२१६६

‘लीव्ह अँड लायसन्स’ कार्यशाळा
मालमत्ता भाड्याने देताना आजकाल बहुतांश लोक ‘रेंट’ किंवा ‘लीज’ कराराऐवजी ‘लीव्ह अँड लायसन्स’ पद्धत पसंत करत आहेत. या प्रक्रियेतून मालकाचे हक्क सुरक्षित राहतात आणि भाडेकरूला तात्पुरते निवास किंवा व्यावसायिक वापराचे अधिकार मिळतात; मात्र योग्य करारनामा तयार करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्काची गणना, शासकीय पोर्टलवर फी भरणे, बायोमेट्रिक प्रक्रिया, तसेच पोलिसांना कळविणे हे सर्व टप्पे तांत्रिक ज्ञानाशिवाय अवघड ठरू शकतात. यासाठी मार्गदर्शन करणारा मास्टरक्लास २५ ऑगस्टला होत आहे. यात प्रत्यक्ष डेमोसह करार तयार करण्यापासून ते ग्राहकाला मंजूर प्रत सुपूर्द करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया शिकवली जाणार आहे. तसेच ११ महिन्यांच्या कराराची नोंदणी बंधनकारक का आहे, कोणती कागदपत्रे लागतात; पोलिस इंटिमेशनचे महत्त्व आणि सरकारमान्य स्वरूपांचा वापर याबाबतही माहिती दिली जाणार आहे. घरमालक, रियल इस्टेट एजंट, वकील, बिल्डर तसेच अतिरिक्त उत्पन्न कमावू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल.
संपर्क : ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२

एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com