ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने

ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने

Published on

एसआयएलसी

ॲमेझॉनवर उत्पादन विक्रीसाठी ऑनलाइन कार्यशाळा

पुणे, ता. २९ : ॲमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करावी, कोणते कागदपत्रे लागतात, किती दिवस लागतात, हे सर्व करून बिझनेस कसा वाढवायचा, ॲमेझॉनवर विक्री करण्यास किती खर्च लागतो, सेलर पोर्टल कसे असायला हवे आदींबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा ३१ जानेवारीला आयोजिली आहे. कार्यशाळेत उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हर करावे, रिटर्न्स असतील तर ते कसे हाताळावे, ॲमेझॉन ॲपवर उत्पादन जास्तीत जास्त कसे दिसतील जेणेकरून विक्री वाढेल, ऑफर कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, तत्काळ सपोर्ट कसा घ्यायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण

निर्जलीकरण व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण थेट निर्जलीकरण उद्योग प्रकल्पात ७ व ८ फेब्रुवारीला आयोजिले आहे. प्रशिक्षणात निर्जलीकरण म्हणजे काय, या तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, निर्जलीकरणासाठीचे प्रमुख घटक, वेगवेगळ्या पद्धती, निर्जलीकरणाद्वारे तयार होणारे घटक पदार्थ व त्याचे उपयोग, उत्पादन व बाजारातील किंमत, निर्जलीकरणासाठी लागणाऱ्या मशिनरी, त्याचा फ्लो चार्ट, उपलब्ध बाजारपेठ, विपणन पद्धती, शासकीय योजना व अनुदान, प्रकल्प उभारण्यासाठी जागेची निवड, अंदाजे गुंतवणूक, प्रकल्प अहवाल इ. विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी, चिकन या पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे.

सरकारी बाजारपेठ (जीईएम पोर्टल) प्रशिक्षण

सरकारी संस्था/विभाग/सार्वजनिक संस्था खरेदी करत आलेल्या विविध वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी एक ई बाजारपेठ म्हणजेच डिजिटल ई-कॉमर्स पोर्टल आहे, ते म्हणजेच जीईएम पोर्टल. या पोर्टलवर सरकारी संस्था/विभाग/सार्वजनिक संस्था यांना लागणाऱ्या वस्तू, एखादा इच्छुक व्यक्ती त्याच्या व्यवसायाची नोंदणी करून त्याच्या सेवा व वस्तू यांची थेट विक्री करू शकतो. हे प्लॅटफॉर्म केंद्र व राज्य सरकारातील मंत्रालये/विभाग, केंद्र व राज्याचे सार्वजनिक उपक्रम, स्वायत्त संस्था आणि स्थानिक संस्थांना सामान्य वापराच्या वस्तू आणि सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने खरेदी करण्यासाठी आरंभापासून अखेरपर्यंत ऑनलाइन मार्केटप्लेस उपलब्ध करून देते. याबाबतच मार्गदर्शन करणारे ऑनलाइन दोन आठवडे चालणारे प्रशिक्षण ९ फेब्रुवारीपासून आयोजिले आहे. व्यवसाय वाढीसाठी हे उपयुक्त प्रशिक्षण आहे.

गरजू विद्यार्थ्यांसाठी सवलतीत कौशल्य प्रशिक्षण

शहरातील गरजू व बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी ‘एसआयआयएलसी’तर्फे सवलतीत दोन महिन्यांचा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासोबत प्रमाणपत्र आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवण्यात येत असून युवक-युवतींना करिअरची दिशा देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत ‘सप्लाय चेन व लॉजिस्टिक्स व्यवस्थापन’ तसेच ‘प्रोफेशनल बॅक ऑफिस व कार्यालयीन प्रशासन’ हे दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सध्याच्या उद्योगविश्वात या दोन्ही क्षेत्रांना मोठी मागणी असून प्रशिक्षित मनुष्यबळासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. तांत्रिक प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. यामध्ये इंग्रजी संभाषण कौशल्य, एमएस ऑफिस, अ‍ॅडव्हान्स एक्सेल, व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखत प्रशिक्षण तसेच नोकरी मार्गदर्शन यांचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थी केवळ नोकरीसाठी पात्र ठरणार नाहीत, तर आत्मविश्वासाने मुलाखतींना सामोरे जाण्यास सक्षम होतील. या प्रशिक्षणासाठी १०वी किंवा १२वी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असून वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे आहे. मर्यादित शुल्कात उपलब्ध असलेला हा कार्यक्रम बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारा ठरणार आहे.
संपर्क : ७७५८९२४२७७, ९०२८९५४४२९

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com