सकाळ कनेक्ट

सकाळ कनेक्ट

Published on

एसआयएलसी
नवीन कामगार संहितांवर प्रशिक्षण
पुणे, ता. ४ : केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कामगार संहितांबाबत उद्योग, संस्था आणि एचआर क्षेत्रातील व्यक्तींना सविस्तर माहिती देण्यासाठी विशेष जनजागृती प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. यामध्ये वेतन संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, औद्योगिक संबंध संहिता तसेच व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कार्यस्थिती संहिता या चारही महत्त्वाच्या कायद्यांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नवीन कायद्यांमुळे कर्मचारी आणि नियोक्ता दोघांवरही काही नवीन जबाबदाऱ्या येत असून, त्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे आयोजकांनी सांगितले. या सत्रामध्ये वेतन रचना, सामाजिक सुरक्षा लाभ, औद्योगिक संबंधांमधील बदल तसेच कार्यस्थळावरील सुरक्षितता आणि आरोग्यविषयक तरतुदी यांची माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितली जाणार आहे. हे प्रशिक्षण रविवारी (ता. ८) दुपारी तीन ते सायंकाळी सहादरम्यान होणार आहे.
----------------------------------------------------
शेवगा लागवड, उत्पादन व निर्यात संधी
स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारात नियमित मागणी असणाऱ्या शेवग्याचा आयुर्वेद औषधांमध्येही वापर वाढला आहे. शेवग्याची आधुनिक लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन व निर्यात व्यवस्थापनाबाबत माहिती करून देणारी कार्यशाळा रविवारी (ता. ८) आयोजित केली आहे. कार्यशाळेत निर्यातक्षम शेवगा उत्पादन पद्धती, आधुनिक जाती, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणी, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, निकष, ट्रेसिबिलिटी, शेवगा निर्यातीसाठी गुणवत्तेची पडताळणी, शेवगा निर्यातीसाठी परकीय बाजारपेठ, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायनमुक्त उत्पादन, निर्यातीसाठी कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियम इत्यादीसंदर्भात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
----------------------------------------------------
यूट्युब, इन्स्टाग्रामसह वाढवा व्यवसाय
स्वतःचा उद्योग, व्यवसाय, व्यापार पुढील स्तरावर नेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी उपयुक्त असणारी ऑनलाइन कार्यशाळा ९ व १० फेब्रुवारीला आयोजित केली आहे. कार्यशाळेत स्वतःच्या उद्योग-व्यवसायाचा ब्रँड वाढवण्यासाठी यूट्युब आणि इन्स्टाग्राम कसे वापरायचे, प्लॅटफॉर्म अल्गोरिदम, ट्रेंड आणि सामग्री निर्मिती (कंटेंट क्रिएशन) समजून घेऊन शूटिंग, संपादन (एडिटिंग) आणि अपलोडिंग कसे करायचे, याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उत्पादन टॅगिंगद्वारे पैसे कसे कमवायचे आणि ब्रँड व्हॅल्यू कशी वाढवायची, विविध यशोगाथा आणि भविष्यातील ट्रेंडपासून प्रेरणा कशी घ्यायची याबाबतही उपयुक्त माहिती दिली जाणार आहे. स्वतःच्या व्यवसायाची ऑनलाइन माध्यमांचा वापर करून भरभराट करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी मिळवून देणारी कार्यशाळा असणार आहे.
----------------------------------------------------
आयुर्वेदिक अभ्यंग मसाज कार्यशाळा
मसाज अथवा आयुर्वेदिक अभ्यंग केल्याने आरोग्यासंबंधी तक्रारी दूर होतात. वात-पित्त-कफाचे संतुलन राखले जाते. आरोग्याच्या जागृतीमुळे गेल्या काही वर्षांत सतत वाढत असणाऱ्या या क्षेत्रात तज्ज्ञ व्यावसायिकांची मागणी आहे. याबाबत मार्गदर्शन करणारी तीनदिवसीय कार्यशाळा १३, १४ व १५ फेब्रुवारीला आयोजित केली आहे. कार्यशाळेत अभ्यंग मर्दन संकल्पना, मसाजचे तंत्र, मंत्र व शास्त्र, मसाजचे फायदे, वात-पित्त-कफ प्रवृतीनुसार मसाज, उपयुक्त औषधी तेले, शिरोभ्यंग, पादाभ्यंग, विविध स्ट्रोक्स, स्नेहन, स्वेदन, पावडर मसाज, उद्‍वर्तन; मसाज केव्हा, कधी किती वेळ करावा, कधी करू नये याबाबत प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन होणार आहे.
----------------------------------------------------
(एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com