लिव्ह अँड लायसन्स मास्टरक्लासचे आयोजन

लिव्ह अँड लायसन्स 
मास्टरक्लासचे आयोजन
Published on: 

पुणे, ता. १६ : मालमत्ता भाड्याने देताना आजकाल बहुतांश लोक ‘रेंट’ किंवा ‘लीज’ कराराऐवजी ‘लिव्ह अँड लायसन्स’ पद्धत पसंत करत आहेत, मात्र योग्य करारनामा तयार करणे, कागदपत्रांची पूर्तता, स्टॅम्प ड्यूटी व नोंदणी शुल्काची गणना, शासकीय पोर्टलवर फी भरणे, बायोमेट्रिक प्रक्रिया तसेच पोलिसांना कळवणे हे सर्व टप्पे तांत्रिक ज्ञानाशिवाय अवघड ठरू शकतात. याबाबत मार्गदर्शन करणारा मास्टरक्लास १९ नोव्हेंबरला आयोजिला आहे. यामध्ये प्रत्यक्ष डेमोसह करार तयार करण्यापासून ते ग्राहकाला मंजूर प्रत सुपूर्द करण्यापर्यंतची प्रक्रिया शिकवली जाणार आहे. तसेच, ११ महिन्यांच्या कराराची नोंदणी बंधनकारक का?, कागदपत्रे, पोलिस इंटिमेशनचे महत्त्व आणि सरकारमान्य स्वरूपांचा वापर याबाबतही माहिती दिली जाणार आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५

व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला
व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला कार्यशाळा २१ व २२ नोव्हेंबरला आयोजिली आहे. शेतीसाठी उपलब्ध होत असलेली मर्यादित जमीन, पाण्याची टंचाई आणि रसायनमुक्त, दर्जेदार भाजीपाल्याची वाढती मागणी लक्षात घेता हायड्रोपोनिक्स हे आधुनिक आणि फायदेशीर तंत्रज्ञान म्हणून वेगाने लोकप्रिय होत आहे. कार्यशाळेत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची ओळख, साधने व फर्टिगेशन, पाण्याची गुणवत्ता व अन्नद्रव्ये, देशी-विदेशी भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती आदी विविध पिकांचे उत्पादन, घरच्या घरी हायड्रोपोनिक युनिट अथवा गार्डन कसे उभारावे, रोपे कशी तयार करावीत, न्यूट्रिएंट सोल्युशन तयार करण्याची पद्धत, प्रकाश, आर्द्रता आणि तापमान व्यवस्थापन तसेच अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे व उपायांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

रिअल इस्टेट एजंटसाठी
डिजिटल मार्केटिंग
रिअल इस्टेट क्षेत्रात ग्राहकांचा विश्वास संपादन करणे, दर्जेदार लीड्स मिळवणे आणि प्रकल्पांची प्रभावी प्रसिद्धी करणे यासाठी डिजिटल मार्केटिंग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या पार्श्वभूमीवर खास रिअल इस्टेट एजंटसाठी केंद्रित ऑनलाइन-ऑफलाइन (हायब्रीड) प्रशिक्षण २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान आयोजिली आहे. प्रशिक्षणामध्ये बांधकाम व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंगचे प्रभावी तंत्र, सर्च इंजिन मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, मोबाईल मार्केटिंग, डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग, गुगल बिझनेस प्रोफाइलचा प्रभावी वापर, फेसबुक व इन्स्टाग्राम जाहिराती, ग्राहक लीड जनरेशन, कंटेंट क्रिएशन, व्हिडिओ मार्केटिंग, एआय-आधारित मार्केटिंग साधने तसेच डिजिटल मोहिमांचे विश्लेषण याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाणार आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.