स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ जयंती उत्‍साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ जयंती उत्‍साहात
स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ जयंती उत्‍साहात

स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ जयंती उत्‍साहात

sakal_logo
By

रसायनी, ता. १५ (बातमीदार) : जीवन कला मंडळ, रसायनी संचलित डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, वाशिवली येथे राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊसाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष तुळशीदास पाटील यांनी, राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन केले तर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य एकनाथ सोनवणे यांनी केले. शिक्षक एन. बी. सोनवणे यांनी जिजाऊ यांच्या पराक्रमी जीवनप्रवास तर एम. आय. सोनवणे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा ठेवा उलगडला. कार्यक्रमात वडगाव ग्रामपंचायत सदस्य एम. के. गडगे, दशरथ पाटील, संतोष पारंगे, संदीप शिंदे, राजेश पाटील, प्राध्यापक कांचन पाटील तसेच शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.