
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
रसायनी, ता. १९ (बातमीदार) ः रसायनीतील वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांच्या हस्ते झाले. दोन दिवसीय प्रदर्शनात २७ प्राथमिक शाळा, २१ माध्यमिक शाळा, एक आश्रमशाळा सहभागी झाल्या होत्या. प्रदर्शन बघण्यासाठी परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी गर्दी केली होती. बक्षीस वितरण रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष अमित शाह, खालापूर तालुका गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास, संजीवनी स्कूलच्या मुख्यधापिका वृषाली सावळेकर प्रमुख पाहुणे पार पडले. सहावी ते आठवी प्राथमिक आणि नववी ते बारावी माध्यमिक अशी दोन गटात स्पर्धा घेण्यात आली. विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, विज्ञान प्रतिकृती, शिक्षक प्रतिकृती स्पर्धा घेण्यात आल्या. वासांबे मोहोपाडा येथील प्रिया स्कूल आर्यन पंडा याला प्राथमिक गटात निबंध स्पर्धात प्रथम आणि विज्ञान प्रतिकृती द्वितीय अशी दोन बक्षिस पटकवली असे शाळेतून सांगण्यात आले.
रसायनी ः तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात