Sat, March 25, 2023

वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई
वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई
Published on : 21 February 2023, 8:33 am
रसायनी, ता. २० (बातमीदार) ः वासांबे-मोहोपाडा येथील महावितरण कार्यालयांतर्गत मोडणाऱ्या गावांतील वीज चोरीला आळा घालण्यासाठी पथकाने कारवाई केली आहे. फेब्रुवारी महिन्यात सात वीज ग्राहकांकडून एक लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मोहोपाडा, मोहोपाडावाडी, खाने आंबिवली आदी गावात कारवाई करण्यात आली. वीज खांबावर आकडा टाकण्याऐवजी ग्राहकांनी मीटरचा वापर करावा, वीज चोरी करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, यापुढेही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती यावेळी महावितरणचे साहायक अभियंता किशोर पाटील यांनी दिली.