Wed, March 29, 2023

महिलांची मोफत आरोग्य तपासणी
महिलांची मोफत आरोग्य तपासणी
Published on : 8 March 2023, 11:29 am
रसायनी, ता. ८( बातमीदार ) : रसायनीतील महिला उद्योग मंडळ तसेच पाताळगंगा आणि रसायनी मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन असोसिएशनच्या डॉ शीतल भगत, मंडळाच्या अध्यक्षा सरोजिनी साजवान, सचिव सुनंदा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या वेळी महिलांची नेत्र आणि दंत चिकित्सा, रक्तातील हिमोग्लोबीन आणि रक्तातील साखर तपासणी, हाडांचा ठिसूळपणा आणि त्वचा रोग तपासणी याशिवाय ई.सी.जी. आदी तपासण्या करण्यात आल्या. १९८ महिलांची शिबिराचा लाभ घेतला. तर काही महिलांना औषध वाटपही करण्यात आले.