वासांबे-मोहोपाडातील पथदिवे बंद

वासांबे-मोहोपाडातील पथदिवे बंद

रसायनी, ता. १० (बातमीदार) ः वासांबे-मोहोपाडा येथील पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील बहुतांश पथदिवे बंद आहेत. त्‍यामुळे रात्रीच्या वेळी गैरसोय होत असल्‍याने नागरिकांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे.
एमआयडीसी कामगार वसाहतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, बकुल अॅरोमॅटीक प्रायव्हेट लिमिटेड, बॉम्‍बे डाईंग लिमिटेड, इनॉक्स इअर प्रोडक्ट लिमिटेड, सिप्ला लिमिटेड अशा कंपन्या असून हजारो कामगारांची वर्दळ असते. याशिवाय शाळा-महाविद्यालये, रुग्‍णालय, रहिवासी संकुले असल्‍याने नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. पथदिवे बंद असल्‍याने चोरीच्या घटना वाढण्याची शक्‍यता आहे. याशिवाय रस्‍त्‍यालगतची झाडे-झुडपे वाढल्‍याने रात्रीच्या वेळी प्रवास करताना असुरक्षित वाटत असल्‍याचे सुजाता पाटील यांनी सांगितले. त्‍यामुळे परिसरातील पथदिवे तातडीने दुरुस्‍त करण्यात यावेत, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी यांनी याबाबत पाताळगंगा एमआयडीसीचे उप अभियंत्‍यांकडे मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com