नवीन मतदार नोंदणी उत्स्फुर्त प्रतिसाद

नवीन मतदार नोंदणी उत्स्फुर्त प्रतिसाद

Published on

रसायनी (बातमीदार) : वासांबे मोहोपाडा येथील मरिआई मंदिरात रविवारी (ता. २३) ग्रामपंचायतीचे माजी सदस्य स्वप्नील बाळकृष्ण राऊत (ठाकरे गट) यांनी १८ वर्षांवरील नवीन मतदारांसाठी नावनोंदणी मोहीम राबवली होती. या मोहिमेत १८९ नवमतदारांनी आपल्या नावाची नोंदणी केली. यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक दोनमधील मोहोपाडा, मोहोपाडावाडी, शिंदी वाडी, पंचशील नगर येथील तरुणांनी नावनोंदणी केली. यावेळी शिबिराला जिल्हा परिषद माजी सदस्य सुरेश म्हात्रे, विभागप्रमुख अजित सावंत, माजी सरपंच रोशन राऊत, माजी उपसरपंच रामचंद्र मुंढे, शहरप्रमुख संतोष पांगत, उपशहरप्रमुख अनिल खराडे, माजी सदस्य भाग्यश्री पवार, अशोक म्हात्रे, भालचंद्र राऊत उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.