बदलत्या हवामानामुळे जायफळ पीक धोक्यात

बदलत्या हवामानामुळे जायफळ पीक धोक्यात

Published on

बदलत्या हवामानामुळे जायफळ पीक धोक्यात
रेवदंडा, ता. ४ (बातमीदार) ः बदलत्या हवामानाचा फटका यावर्षी चौल-रेवदंडा परिसरातील जायफळाच्या पिकाला बसला आहे. त्यामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत. जसे तापमान वाढत आहे, तसेच पावसाचे प्रमाणही बदलत असल्याने पीक नष्ट होण्याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे.
चौल-रेवदंडा परिसरातील वाळूयुक्त माती व नारळ-पोफळीच्या सावलीखाली जायफळाची चांगली पिकवाटिका येते. सुमारे चारशे वर्षांपासून या भागात हे पीक घेतले जात आहे, परंतु मागील काही वर्षांत हवामान बदलामुळे नुकसान झाले आहे. गेल्या चार वर्षांत आलेल्या निसर्ग चक्रीवादळांनी अनेक झाडे उन्मळून टाकली, काही ठिकाणी जायफळ बागायतींचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. याशिवाय, गेल्या दोन वर्षांत वाढलेल्या उष्णतेमुळे झाडांची पानगळ व फळांच्या आकारात घट झाली आहे. जायफळाचे झाड साधारण १० वर्षांनी पूर्ण उत्पादन देते, प्रत्येक झाड सुमारे १५० ते १७५ फळे देते. यावर्षी हवामान बदलामुळे उत्पादनात सुमारे तीस टक्के घट झाली असून ऑगस्ट अखेरीस हंगाम संपुष्टात आला आहे. फळांचे भाव आकारमानानुसार २०० ते ६०० रुपये प्रती शेकडा दराने आहेत.
............
स्‍थानिकांच्या रोजगारावर गदा
जायफळाचा उपयोग सुगंध व चव वाढवण्यासाठी श्रीखंड, पेढे, बर्फी, हलवा, बासुंदी अशा पदार्थांमध्ये तसेच औषधी गुणधर्मासाठी होतो. चौल-चंपावती आळीतील कृषी अभ्यासक शैलैश राईलकर यांनी जायफळ पावडर बनवण्याचा व्यवसाय सुरू केला असून, पुणे, मुंबई, ठाणे येथे याला मागणी आहे. रेवदंडा येथील जुन्या पोस्ट ऑफिस गल्लीत शलाका राऊत यांनी जायफळाच्या आवरणाचे लोणचे व मुरांबे तयार करून महिलांना रोजगाराची संधी दिली आहे. या पिकाचा व्यवसाय तळकोकणातील अनेक बचत गटांनी व्यवसाय म्हणून स्वीकारला आहे, मात्र मागील काही वर्षांत उत्पादन घटत असल्याने स्‍थानिकांच्या व्‍यवसायावर गदा येऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com