डिझेल चोरीप्रकरणी चालकाला अटक

डिझेल चोरीप्रकरणी चालकाला अटक

Published on

डिझेल चोरीप्रकरणी चालकाला अटक
रेवदंडा (बातमीदार) ः येथील पोलिस ठाणे हद्दीतील रेवदंडा बाह्यवळण मार्गावरील एका पोकलेनमधील शंभर लिटर डिझेल चोरण्यात आले आहे. या प्रकरणात रेवदंडा पोलिसांनी बिहारच्या भोजपूर येथून चालक दीपक चौधरीला (वय २१) अटक केली आहे.
पोकलेनच्या डिझेल टाकीतून पाइपच्या साहाय्याने नऊ हजार १०० रुपयांची चोरी झाली होती. याप्रकरणी कंपनीचे अधिकारी शैलेश तोरणे (वय ३६) यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

Marathi News Esakal
www.esakal.com