रायवळ आंब्याची प्रतीक्षा कायम

रायवळ आंब्याची प्रतीक्षा कायम
Published on

रायवळ आंब्याची प्रतीक्षा कायम
रेवदंडा, ता. १२ (बातमीदार) : अवकाळी पावसामुळे यंदा आंब्याचे भाव घसरण्याची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात उत्पादन घटल्याने आंब्याचे भाव अजूनही उच्चच राहिले आहेत. विशेषतः रायवळ आंब्याची आवक कमी असल्याने बाजारात त्याची प्रतीक्षा कायम आहे.
मुरूड तालुक्यातील चोरडा, वळके, कोर्लई, भुईघर तसेच अलिबाग तालुक्यातील चौल, वावे आदी भागातून पूर्वी मोठ्या प्रमाणात रायवळ आंबा बाजारात येत असे. मात्र, काही वर्षांपूर्वी झालेल्या ‘निसर्ग’ व ‘तौक्ते’ चक्रीवादळांमुळे अनेक बागायतदारांचे आंब्याचे वृक्ष मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले. त्यामुळे उत्पादनावर त्याचा दीर्घकालीन परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय यंदा मोहोर येण्याच्या काळात ढगाळ वातावरण राहिल्याने मोठ्या प्रमाणात मोहोर गळून पडला. परिणामी फळधारणा कमी झाली असून, बाजारात रायवळ आंब्याची उपलब्धता घटली आहे. त्यामुळे चाकरमानी, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये रायवळ आंब्याची उत्सुकता व प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com