
गडब येथे श्रीगणेश पालखीचे स्वागत
वडखळ, ता. २४ (बातमीदार) : श्री गणेश पदयात्री मंडळ कुंडेगाव-उरण यांच्या विद्यमाने श्री गणेश जयंतीनिमित्त कुंडेगाव ते पाली श्री गणेश पालखी काढण्यात आली होती. या पालखीचे स्वागत पेण तालुक्यातील गडब येथे आगमन झाल्यानंतर एल. के म्हात्रे, कमलाकर म्हात्रे, गणपत पाटील, प्रभाकर पाटील, नामदेव पाटील आदींनी केले. तसेच श्री गणेश पदयात्री मंडळातील पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. गडब काराव ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य मनोहर पाटील, सीता पाटील यांचा एल. के.म्हात्रे परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी श्री गणेश पदयात्री मंडळ कुंडेगावतर्फे एल. के. म्हात्रे यांचाही सत्कार करण्यात आला. श्री गणेश पदयात्री मंडळ, कुंडेगाव महिला भजन मंडळ, गडब जांभेळा यांनी भजन सादर केले. ग्रामस्थांनी श्री गणेश पालखीचे दर्शन घेवून पदयात्रींना शुभेच्छा दिल्या.