हमरापूर रेल्‍वे स्‍थानकाला समस्‍याचे ग्रहण

हमरापूर रेल्‍वे स्‍थानकाला समस्‍याचे ग्रहण

वडखळ ता. ३१ (बातमीदार) ः हमरापूर रेल्वे स्‍थानकात दिवा-रत्नागिरी व दिवा-सावंतवाडी गाड्यांना थांबा नसल्‍याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होते. या ग गाड्यांना थांबा मंजूर करणे, हमरापूर रेल्वे स्‍थानकात संगणकीय तिकीट विक्री, प्रवाशांसाठी निवाराशेड, आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व रेल्वे स्‍थानकापर्यंत रस्‍ता तयार करणे आदी समस्‍या सोडवण्यासाठी हमरापूर विभागातील रेल्वे प्रवाशांनी खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली. या वेळी लवकरच हे सर्व प्रश्न मार्गी लागतील, असे आश्वासन तटकरे यांनी दिले आहे.
कोरोना काळापूर्वी रत्नागिरी-दिवा व सावंतवाडी-दिवा या दोन पॅसेंजर गाड्या हमरापूर स्‍थानकात थांबा घेत होत्या. या स्‍थानकातून दररोज हमरापूर, तांबडशेत, जोहे, कळवे, रावे, दादर, सोनखार, उर्णोली, वरेडी, खारसापोली इरवाडी, तरणखोप, आंबिवली, बळवली, गोविरले, कोपर, डावरे हनुमानपाडा, खारसापोली बेडे इत्यादी गावांतील नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात. या गाड्यांचा थांबा पूर्ववत केल्‍यास रेल्वेच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होईल. यावेळी हमरापूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रदीप म्हात्रे, पद्माकर पाटील, कल्पेश पाटील आदींसह रेल्वे प्रवासी उपस्थित होते.

वडखळ ः हमरापूर विभागातील रेल्वे प्रवाशांनी खासदार सुनील तटकरे यांना निवेदन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com