इतर राज्यांतील विराेधक मोदीविरोधासाठीच एकत्र!

इतर राज्यांतील विराेधक
मोदीविरोधासाठीच एकत्र!
Published on: 

इतर राज्यांतील विराेधक
मोदींविरोधासाठीच एकत्र!

इंडिया आघाडीवर मुख्यमंत्र्यांची टीका

पालघर, ता. ९ : इंडिया आघाडीतील घटक पक्ष विविध राज्यांत एकमेकांच्या विरोधात लढत असताना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधासाठी दिल्लीत एकत्र येतात. या आघाडीत कोणतीही वैचारिक एकता नसून, मोदीविरोध हाच त्यांच्या एकत्र येण्यामागील एकमेव उद्देश आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर येथील दौऱ्यादरम्यान केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याबरोबरच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही सरकारची भूमिका स्पष्ट केली.

राज्यातील विविध भागांत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातही ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक असून, त्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी चर्चा झाल्याची माहिती देताना फडणवीस म्हणाले, की मागील काळात झालेल्या चुका सुधारण्यासाठी नव्याने नियुक्त केलेल्या अध्यक्षांना थेट दोषी कसे धरता येईल, हा प्रश्न आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात येणार असून, चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. इंडिया आघाडीतील पक्षांच्या परस्परविरोधी भूमिकांवर टीका करतानाच शेतकरी आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी या वेळी केला.
-----
एमपीएससी आंदाेलनाला राजकीय स्वरूप!
एमपीएससीच्या प्रश्नावर सुरुवातीला विद्यार्थ्यांचे आंदोलन होते; मात्र नंतर या आंदोलनाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची भूमिका सरकारने घेतल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com