इथे आहे, सूर्याजी मालुसरे यांचे समाधिस्थळ...पाहा कसे आहे....

देवेंद्र दरेकर
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

सूर्याजी यांचे समाधिस्थळ दुर्लक्षित आहे. सूर्याजी यांच्या वंशजांनीही सरकारचे याकडे लक्ष वेधले आहे. 

पोलादपूर, : कोंढाणा किल्ला सर करत असताना सुभेदार तान्हाजी मालुसरे धारातीर्थी पडले. त्यानंतर तो गड सर करण्यासाठी त्यांचे बंधू सूर्याजी यांनी निकराची झुंज दिली. त्यामुळेच तो गड पुन्हा स्वराज्यात सामील झाला. हा इतिहास सुवर्णपानांनी लिहिला असला तरी सूर्याजी यांचे पोलादपूर तालुक्‍यातील साखर येथील समाधिस्थळ दुर्लक्षित आहे. सूर्याजी यांच्या वंशजांनीही सरकारचे याकडे लक्ष वेधले आहे. 

सकारात्मक बातमी : शिक्षकांची पदे भरणार

दुर्गम भागात साखरगाव आहे. मालुसरे बंधूंच्या कर्मभूमी उमरठपासून हा गाव आठ किलोमीटरवर असून तेथे सूर्याजी आणि यांच्या पत्नी सती यांचे समाधिस्थळ आहे. या ठिकाणी जाणारा मार्ग बिकट आहे. परिसरात गवताचा वेडा आहे.

हे वाचा : मुंबई - गोवा मार्गावर कार कोसळली

‘तान्हाजी’ चित्रपट प्रर्दशित झाल्यानंतर उमरठ गावाकडे पर्यटक, शिवप्रेमींची गर्दी वाढली आहे. त्यातील काही जण सूर्याजी यांच्या समाधिस्थळालाही भेट देतात. मात्र या ठिकाणी असुविधा असल्याचे ते नाराजी व्यक्त करीत आहेत.
नरवीर तान्हाजी मालुसरे यांचे बंधू सूर्याजी मालुसरे यांचे समाधिस्थळ दुर्लक्षित आहे. या ठिकाणी असुविधा आहेत. त्यामुळे सरकारने येथे लक्ष देऊन योग्य निधी द्यावा.
- सुनील मालुसरे, सूर्याजी यांचे वंशज

उमरठकडे येणार पर्यटक साखर येथे सूर्याजी यांच्या समाधिस्थळला भेट देतात. मात्र येथील असुविधा पाहून ते नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे पाठपुरावा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
- अनिल मालुसरे, सूर्याजी यांचे वंशज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tomb of Suryaji Malusare is ignored