esakal | मुंबईमधील प्रसिद्ध पालिका रुग्णालये कोणती माहित आहे का?
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईमधील प्रसिद्ध पालिका रुग्णालये कोणती माहित आहे का?

उपचारांसाठीच नव्हे तर अन्य बाबतीतही अग्रेसर आहेत 'ही' रुग्णालये

मुंबईमधील प्रसिद्ध पालिका रुग्णालये कोणती माहित आहे का?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

मुंबई हे शहर कायमच विविध कारणांसाठी चर्चेत येत असतं. अगदी येथील खाऊगल्ल्यांपासून ते पालिकेच्या निवडणुकांपर्यंत, प्रत्येक गोष्टीची येथे चर्चा होत असते. यामध्येच कायम एक मुद्दा चर्चिला जातो तो म्हणजे पालिकेची रुग्णालये. खरं तर पालिका रुग्णालये म्हटलं की अनेक जण नाकं मुरडतात. रुग्णालयामधील स्वच्छता किंवा आरोग्यविषयक सोयीसुविधा यांच्याविषयी कायम नागरिकांमधून तक्रारीचा पाढा ऐकायला मिळतो. मात्र, आज आपण पालिकेची अशी काही रुग्णालये पाहणार आहोत, जे केवळ उपचारांसाठीच नव्हे तर अन्य बाबतीतही अग्रेसर आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची प्रसिद्ध रुग्णालये कोणती ते पाहुयात. 

१.  कस्तुरबा रुग्णालय -

मुंबईतील चिंचपोकळी येथे असलेलं कस्तुरबा रुग्णालय हे सरकारी रुग्णालय आहे. या रुग्णालयाला बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अर्थसहाय्य दिलं जातं. या रुग्णालयात किरकोळ आजारापासून शस्त्रक्रियेपर्यंत विविध पद्धतीच्या उपचार पद्धती केल्या जातात. सध्याच्या काळात  या रुग्णालयात कोरोना चाचणी केंद्र उभारण्यात आलं आहे.

२.  नायर रुग्णालय -

मुंबईतील आणखी एक पालिकेचं रुग्णालय म्हणजे नायर रुग्णालय. मुंबई सेंट्रल येथे असलेलं हे रुग्णालय येथील उपचार पद्धती आणि भव्य इमारतीसाठी प्रसिद्ध आहे.

३. के.ई.एम रुग्णालय -

परळ येथे असलेलं के.ई.एम रुग्णालय हे कोणाला माहित नसेल असं फार क्वचित होईल. येथे सर्व सामान्य माणसांची कायमच रेलचेल असते. परळमधील आचार्य दोंदे मार्गावर हे भव्य रुग्णालय आहे.

४. सायन रुग्णालय -

मुंबईतील आणखी एक प्रसिद्ध रुग्णालय म्हणून सायन हॉस्पिटलकडे पाहिलं जातं. हे हॉस्पिटल खासकरुन मदर मिल्क बँक आणि हाय व्हॉल्यूम ट्रामा सेंटरसाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयात दररोज २५० पेक्षा जास्त रुग्ण अॅडमिट होतात आणि तितक्याच नागरिकांना दररोज डिस्चार्जदेखील दिला जातो, असं सांगण्यात येतं.

हेही वाचा : केरळातील विद्यार्थांचा डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल, नेमकं यात काय आहे खास

५.  बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर (एच.बी. टी.) रुग्णालय    -

पालिकेचं प्रसिद्ध आणि कायम चर्चेत राहणारं रुग्णालय म्हणजे बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय. जोगेश्वरी येथे असलेल्या या रुग्णालयात कायमच नागरिकांची वर्दळ पाहायला मिळते.

६.सेव्हन हिल्स रुग्णालय -

सेव्हन हिल्स रुग्णालय अंधेरी, मरोळ येथे असून हे रुग्णालय त्याच्या सुसज्जतेमुळे खासकरुन ओळखलं जातं.
 

loading image