वेब सीरिजच्या नावाखाली ३७ लाखांची फसवणूक; प्रसिद्ध दिग्दर्शिकेला अटक | Web Series | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

culprits arrested

वेब सीरिजच्या नावाखाली ३७ लाखांची फसवणूक; प्रसिद्ध दिग्दर्शिकेला अटक

sakal_logo
By
स्वाती वेमूल

वेब सीरिजसाठी घेतलेल्या ३७ लाख रुपयांचा अपहार करत, फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शिका रोशन बिंदरला वर्सोवा पोलिसांनी अटक केली. अंधेरीतील यारीरोड-वर्सोवा परिसरातील एका ५० वर्षीय महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. संबंधित महिलेच्या इमारतीत अभिनेता हितेन तेजवानी राहतो. तक्रारदार महिला, हितेन आणि रोशन बिंदर या तिघांनी मिळून एक वेब सीरिज बनवण्याचा निर्णय घेतला होता. हितेनच्या सांगण्यावरून तक्रारदार महिलेने ३७ लाख रुपये गुंतवले होते.

द अदर्स (डी कोड) नावाची ही वेब सीरीज पूर्ण झाल्यानंतर त्याचे हक्क हार्ड डिस्क, उल्लू डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड चॅनेलला विकून त्यातून मिळालेली रक्कम तिघे समान वाटून घेणार होते. त्यासाठी या तिघांच्या नावाने एक संयुक्त खाते उघडण्यात आले होते. मात्र बँकेत जमा झालेल्या या पैशांचा रोशन बिंदर यांनी परस्पर अपहार करुन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे.

हेही वाचा: निलेश साबळे नारायण राणेंच्या पाया पडले; 'त्या' भूमिकेसाठी माफी!

तक्रारीनंतर गुन्हा नोंदवून पोलिसांनी रोशन बिंदरला अटक केली. रोशन या दिवंगत दिग्दर्शक गॅरी बिंदर यांच्या पत्नी आहेत. गॅरी हे एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्समध्ये काम करत होते.

loading image
go to top