निलेश साबळे नारायण राणेंच्या पाया पडले; 'त्या' भूमिकेसाठी माफी! Nilesh Sable | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane and Nilesh Sable

निलेश साबळे नारायण राणेंच्या पाया पडले; 'त्या' भूमिकेसाठी माफी!

झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' Chala Hawa Yeu Dya हा लोकप्रिय कार्यक्रम सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांची नक्कल करणारं पात्र दाखवण्यात आलं होतं. यावरून राज्यभरात संताप व्यक्त केला गेला. नारायण राणेंची बदनामी होईल असं पात्र रंगवण्यात आलं, असा आरोप राणे समर्थकांनी केला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निलेश साबळे Nilesh Sable आणि त्यांच्या टीमने नारायण राणे यांची भेट घेतली.

निलेश साबळे आणि कार्यक्रमातील काही सहकाऱ्यांनी मिळून राणेंच्या अधिश निवासस्थानी भेट घेतली आणि नारायण राणे यांची पाया पडून माफी मागितली. "कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. आमच्या टीमकडून पुन्हा अशी चूक होणार नाही," असं निलेश साबळे यांनी यावेळी म्हटलं.

हेही वाचा: 'पाठीमागून वार करणारी लोकं' म्हणत 'जय भीम'च्या लेखकाने परत केलं मानधन

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या 'दिवाळी अधिवेशन' विशेष कार्यक्रमात राणे यांचं हुबेहूब पात्र दाखवण्यात आलं होतं. या पात्रावर राणे समर्थकांनी आक्षेप नोंदविला आहे. राणे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी झी टीव्ही तसंच निलेश साबळे यांना फोन करून संताप व्यक्त केला होता.

loading image
go to top