ठाणे जिल्ह्यात एकाच दिवसात उच्चांकी रुग्णांची नोंद; वाचा आजची आकडेवारी

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 2 May 2020

  • शनिवारी सर्वाधिक 97 रुग्णांची नोंद 
  • ठाणे जिल्ह्यात एकुण 1 हजार 109 कोरोनाबाधित 

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीचीवाढ होत असल्याचे दिसून येत आहे. असे असतांना, शनिवारी सर्वाधिक 97 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात अली असून ठाणे व ठाणे ग्रामीण क्षेत्रात प्रत्येकी एक असा दोघांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. 

ठाण्यातील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आता ठाणे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 1 हजार 109 इतका झाला असून मृतांचा आकडा 31 वर पोहोचला आहे. तसेच ठाणे शहरापाठोपाठ नवी मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्यावाढ आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत अधिक भर पडत आहे. 
ठाणे जिल्हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजन करण्यात येत आहे. तरी देखिल शनिवारी जिल्ह्यात आज पर्यंतची सर्वाधिक 97 नवीन कोरोनाबाधीत आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात शनिवारी 39 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून तेथील बाधितांचा आकडा 289 वर पोहोचला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 28 बाधितांची नोंद करण्यात आली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील बाधितांचा आकडा 372 तर, मृतांचा आकडा 15 वर गेला आहे. कल्याण डोंबिवलीत 12 रुग्णांची नोंद झाल्याने तेथील बाधितांचा आकडा 181 झाला. तसेच मीरा भाईंदरमध्ये बाधितांचा आकडा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी चार रुग्ण आढळून आल्याने तेथील बाधितांचा आकडा 165 झाला. 

PF मधून पैसे काढणाचं प्रमाण वाढलं; अर्थतज्ज्ञ देतायत 'हा' महत्त्वाचा सल्ला.

उल्हासनगरमध्ये एकाही रुग्णाची नोंद नाही
भिवंडीत तीन नवीन बाधितांच्या नोंदीमुळे बाधितांचा आकडा 16 इतका झाला. अंबरनाथमध्ये दोघे नवीन रुग्ण आढळल्याने तेथील आकडा दहा झाला. तर, बदलापूरमध्ये पाच नवीन रुग्ण सापडल्याने तेथील आकडा 35 वर पोहोचला आहे. ठाणे ग्रामीण भागात चार नव्या बाधितांसह एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे तेथील बाधितांचा आकडा 31 तर, मृतांचा आकडा दोन वर गेला आहे. तर, शनिवारी एकट्या उल्हासनगरमध्ये एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A total of 1 thousand 109 corona affected in Thane district