मुंबईत आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोविड चाचण्या; तर 'इतक्या' लोकांचा विलगीकरण कालावधी पूर्ण..

covid test
covid test

मुंबई: मुंबईत आज पर्यंत 3 लाख 64 हजार 753 चाचण्या करण्यात आल्या आहेत. कालावधी पूर्ण तर आता डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवायही चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शहरातील 13 लाख 44 हजार नागरीकांचा विलगीकरण कालावधी पुर्ण झाला आहे. 

कोविडच्या नियमीत चाचण्यांबरोबर अर्ध्या तासात अहवाल  चाचण्याचे 1 लाख किट खरेदी करण्यात आले असून 3 जुलै पासून या चाचण्याची सुरवातही झाली आहे.त्यामुळे कोविड चाचण्याची रोजची संख्या 5 हजाराच्या पुढे गेली आहे.बुधवारी मुंबईत 5 हजार 483 चाचण्या झाल्या असा दावा पालिकेने केला आहे.

मुंबईत आता पर्यंत 16 लाखाहून अधिक नागरीकांचे विलगीकरण करण्यात आले असून त्यातील 13 लाखाहून अधिक नागरीकांचा विलगीकरण कालावधी पुर्ण झाला आहे.शोध,चाचणी उपचार यामुळेच धारावी सारख्या एकेकाळी असलेल्या हॉटस्पॉट मधिल कोविड संक्रमण नियंत्रणात आले आहे.

देशभरात कोरोना विषाणू संक्रमणाच्या अभ्यासासाठी, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरो सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. हेच सर्वेक्षण मुंबईतही नीती आयोग, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च  आणि इतर संस्था यांच्या सहकार्याने सुरु करण्यात आले आहे. 

यात 10 हजार नागरीकांचे रक्ताचे नमुने घेण्यात येणार असून रक्तातील प्रतिद्रव्ये तपासली जाणार आहे.यामुळे शहरातील कोविडचा कल समजू शकणार आहे. चेंबर,माटूंगा,शिव, वडाळा, दहिसर या भागातील नागरीकांच्या तपासण्या होणार आहेत.

कधी किती कोविड चाचण्या? 

३ फेब्रुवारी -- पहिली कोविड चाचणी 

11 मार्च -- पहिला कोविड रुग्ण 

6 मे पर्यंत -- 1 लाख चाचण्या 

1 जून -- 2 लाख चाचण्या 

24 जून -- 3 लाख चाचण्या 

8 जूलै -- 3 लाख 64 हजार 753 चाचण्या 
total 3 lac more covid test done in mumbai 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com