गड-किल्ल्यांमध्ये पर्यटकांना प्रवेश बंदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

अलिबाग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुरातत्त्व विभागाने जिल्ह्यातील गड-किल्ल्यांमध्ये पर्यटकांना बंदी घातली आहे. ही बंदी ३१ मार्चपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाचे अधिकारी एलिकर यांनी दिली.  दिल्ली येथील आयुक्तांच्या आदेशानुसार पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या गड-किल्ल्यांवर प्रवेशबंदीचे आदेश जारी केले आहेत.

अलिबाग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुरातत्त्व विभागाने जिल्ह्यातील गड-किल्ल्यांमध्ये पर्यटकांना बंदी घातली आहे. ही बंदी ३१ मार्चपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाचे अधिकारी एलिकर यांनी दिली.  दिल्ली येथील आयुक्तांच्या आदेशानुसार पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या गड-किल्ल्यांवर प्रवेशबंदीचे आदेश जारी केले आहेत.

माेठी बातमी : गुढीपाडव्‍याच्‍या बाजारपेठेवर कोरोनाची संक्रांत

रायगड जिल्ह्यात अलिबागमधील कुलाबा किल्ला, जंजिरा, खांदेरी, कर्नाळा, आगरकोट, घोसाळे, कोर्लई, तळगड आदी गड-किल्ले पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते; मात्र कोरोना विषाणूमुळे संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी पुरातत्त्व विभागाने खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यातील गड-किल्ल्यांवर ३१ मार्चपर्यंत बंदी कायम ठेवल्याचे एलिकर यांनी सांगितले.

महत्‍चाची बातमी : मास्‍क नक्‍की कसा वापरावा? १० अत्‍यंत महत्‍वाच्‍या टिप्‍स...

रायगड रोपवे ३१ मार्चपर्यंत बंद
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारतर्फे कठोर पावले उचलली जात आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत रायगड रोपवे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती रायगड रोपवेचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र खातू यांनी दिली.

फणसाड अभयारण्यात पर्यटकांना बंदी 
राज्यातील सर्व संरक्षित वनक्षेत्रे ३१ मार्चपर्यंत पर्यटनासाठी बंद राहतील. हा निर्णय १८ मार्चपासून लागू करण्यात आला असून जिल्ह्यातील फणसाड अभयारण्यात पर्यटकांना प्रवेशबंदी जाहीर करण्यात आली आहे.

पर्यटन जलवाहतुकीला बंदी
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अखत्यारित येणारे जलक्रीडा व नौका विहार प्रकल्पांबरोबरच गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा, थळ ते खांदेरी किल्ला, किहिम ते खांदेरी किल्ला, दिघी ते जंजिरा किल्ला, मुरूड ते जंजिरा किल्ला, मुरूड ते पद्मदुर्ग (कासा किल्ला), राजपुरी ते जंजिरा किल्ला या जिल्ह्यातील स्थळांवर पर्यटक जलवाहतूक ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जलप्रवासी वाहतूक ही अत्यावश्‍यक सेवेत मोडत असल्याने आवश्‍यक ती खबरदारी घेऊन गोफण- सानेगाव- गोफण, राजपुरी- दिघी- राजपुरी, दिघी-आगरदांडा (रो-रो), दिघी- आगरदांडा- दिघी या जलमार्गावरील जलप्रवासी वाहतूक सुरू ठेवण्यात यावी, असे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड राजपुरी बंदरे समूहातील उपसंरक्षक तथा प्रादेशिक बंदर अधिकारी कप्तान सी. जे. लेपांडे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourist access barred in fortresses