#COVID19 : मास्क नक्की कसा वापरावा? १० अत्यंत महत्त्वाच्या टिप्स...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 मार्च 2020

मुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतेय. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात कोरोना फोफावतोय. अशात सर्वात जास्त कन्फ्युजन कशाचं असेल तर ते म्हणजे कोरोनासाठी वापरण्यात येणाऱ्या मास्कचं आहे. दरम्यान मास्क कुणी घालावेत कुणी घालू नयेत या साठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही गाईडलाईन्स आखल्या आहेत.  

मुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतेय. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात कोरोना फोफावतोय. अशात सर्वात जास्त कन्फ्युजन कशाचं असेल तर ते म्हणजे कोरोनासाठी वापरण्यात येणाऱ्या मास्कचं आहे. दरम्यान मास्क कुणी घालावेत कुणी घालू नयेत या साठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही गाईडलाईन्स आखल्या आहेत.  

मोठी बातमी - १०० टक्के 'वर्क फ्रॉम होम'ला कॉर्पोरेट सेक्टरचा होकार; CSR फंडातून होणार सरकारला मदत

मास्क कुणी घालावं  :

केंद्रीय मंत्रालयाने आखून दिलेल्या गाईडलाईन्स :  

 •  जर तुम्हाला COVID-19 ची लक्षणं असतील तर तुम्ही मास्क वापरायला हवा.
 • कफ, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होणं ही COVID-19 ची लक्षणे आहेत
 • जर तुम्ही कुणी कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीची काळजी घेत असाल तर तुम्हाला मास्क वापरायलाच हवं 
 • जर तुम्ही श्वसनाचे इलाज करणाऱ्या दवाखान्यात किंवा डॉक्टर्सकडे कामाला असाल तर तुम्ही मास्क वापरायलाच हवं.    

मोठी बातमी -  कोरोना राक्षसाला मारतायत आपल्याच शरीरातील 'हे' पोलिस, वाचा एक महत्त्वाचा रिपोर्ट !

मास्क घालताना काय लालाजी घ्यावी : 

 1. मास्क सीलबंद पाकिटातून उघडताना काळजी घ्या, मास्कचा आतल्या किंवा बाहेच्या पृष्ठभागावर आपला हात लागणार नाही याची दक्षता घ्या. मास्कच्या प्लेट्स नीट उघडा. 
 2. तुमचं नाक, तोंड आणि हनुवटी पूर्णपणे झाकली जाईल अशा प्रकारे मास्क लावा.
 3. मास्क लावल्यावर ते कुठूनही उघडं नाहीयेना याची खात्री करा. मास्क चेहऱ्यावर नीट फिट बसतंय ना हे देखील तपासून घ्या.   
 4. मास्क लावल्यावर त्याला अजिबात स्पर्श करू नका, चेहऱ्याला आणि नाकाला हात लावणं टाळा.  
 5. मास्क गळ्याभोवती लटकत ठेऊ नका. 
 6. दर सहा तासांनी किंवा मास्क ओलं झालं असेल तर मास्क बदलायला हवं. 
 7. एकदा वापरल्यावर हे मास्क पुन्हा वापरू नये. मास्क फेकून द्यावेत 
 8. मास्क फेकताना हे कचऱ्याच्या बंद डब्ब्यात फेकावे, मास्क फेकताना त्यावर जंतुनाशकं फवारायला हवीत.  
 9. मास्क काढताना मास्कच्या पृष्ठभागाला अजिबात हात लावू नका, नाहीतर मास्कवरील विषाणू तुमच्या हाताला लागतील. 
 10. मास्क काढल्यानंतर हात धुणं गरजेचं आहे. मास्क काढल्यानंतर तुमचे हात सॅनिटायझर किंवा हँडवॉश ने नीट धुवायलाच हवे.

how to use N95 or general masks read 10 tips while using corona mask


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to use N95 or general masks read 10 tips while using corona mask