esakal | पर्यटन व्यावसायिकांसाठी टुरिस्ट गाईड प्रशिक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पर्यटन व्यावसायिकांसाठी टुरिस्ट गाईड प्रशिक्षण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : रायगड (Raigad) जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने दिवसेंदिवस महत्त्वाचा ठरत आहे. मात्र, जिल्ह्यात टुरिस्ट गाईडची संख्या कमी असल्याने पर्यटकांना (Tourist) जिल्ह्याच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि अन्य पर्यटनाची योग्य माहिती मिळत नाही.

त्यामुळे बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेच्यावतीने अलिबागमध्ये १० दिवसांचे 'टुरिस्ट गाईड' व्यावसायाभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रायगड जिल्हा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. शनिवार व रविवार तसेच अन्य सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येतात. जिल्ह्यात पर्यटन वाढीला चालना देण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी टुरिस्ट गाईड प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण निवासी अनिवासी असून मोफत आहे.

हेही वाचा: औरंगाबाद-मुंबई एअर इंडिया विमान परतले, शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस

९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये भविष्यातील पर्यटन संधी ओळखून कोकण, विशेष करून रायगडमधील निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक वारसा, "किल्ले आणि खाद्य संस्कृतीची संपूर्ण माहिती, तसेच मार्केटिंग, संवाद कौशल्य, प्रकल्प अहवाल, आत्मविश्वास बांधणी अशा अनेक विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ०२१४१-२२२२१४.

loading image
go to top