
नवनीत बऱ्हाटे
उल्हासनगर : उल्हासनगरच्या रस्त्यांवरील बेफाम पार्किंगवर आता आळा बसणार आहे. सात महिन्यांपासून बंद असलेली 'टोइंग व्हॅन' सेवा पुन्हा सुरू झाली असून, नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. वाहतुकीला अटकाव करणाऱ्या वाहनांवर आता दयामाया न करता यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. 'बिनधास्त पार्किंग' संस्कृतीला चाप बसवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली असून, नियम झुगारणाऱ्या वाहनचालकांना आता सरळ कारवाईचा सामना करावा लागणार आहे.