

Mumbai News
Esakal
मुंबई : घरातील तांदळाच्या साठ्याचे उंदीर व किडींपासून संरक्षण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या अत्यंत विषारी रासायनिक पदार्थाच्या संपर्कात आल्याने अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीची प्रकृती गंभीर झाली आहे. ही घटना बुधवारी (ता. १०) घडल्याचे समजते. अवघे नऊ किलो वजन असलेल्या या बालिकेवर मुंबईतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, गेल्या १५ तासांत तिचे हृदय तीन वेळा बंद पडले होते. सध्या तिला अत्याधुनिक जीवनरक्षक उपचारांवर ठेवण्यात आले आहे.