लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्येही; निर्देशांकांचा सर्वकालिक उच्चांक

कृष्ण जोशी
Saturday, 14 November 2020

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर झालेल्या दीड तासांच्या ट्रेडिंगमध्येही आज भारतीय निर्देशांकांनी जवळपास अर्धा टक्का आगेकूच केली. निफ्टी व सेन्सेक्स या दोघांनीही आज सर्वकालिक उच्चांक नोंदविले. 

मुंबई ः लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर झालेल्या दीड तासांच्या ट्रेडिंगमध्येही आज भारतीय निर्देशांकांनी जवळपास अर्धा टक्का आगेकूच केली. निफ्टी व सेन्सेक्स या दोघांनीही आज सर्वकालिक उच्चांक नोंदविले. 

हेही वाचा - 40 ते 45 फूट तारळी नदीत मिनीबस कोसळून ५ जण ठार; नवी मुंबईतील नायर कुटूंबियांवर काळाचा घाला

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगला समभागांची खरेदी करायची अशी परंपरा आहे. त्यासाठी आज अनेक लहानमोठे शेअरदलाल आपल्या कुटुंबियांसह नटूनथटून कार्यालयात आले होते. संध्याकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान आज व्यवहार झाले. बाजार उघडल्यावर झालेल्या खरेदीच्या जोरावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी यांनी आज सुरुवातीलाच अनुक्रमे 43,830.93 व 12,827.09 असे सर्वकालिक उच्चांक नोंदविले. मात्र नंतर नफेखोरीमुळे निर्देशांक त्या पातळीला टिकू शकले नाहीत व बाजार बंद होताना ते अनुक्रमे 43,637.98 व 12,770.60 या पातळीवर बंद झाले. 

हेही वाचा - कोविड सेंटर, रुग्णालयात डॉक्टर्स, रुग्णांची दिवाळी! कोरोना रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा प्रयत्न

आज सेन्सेक्समधील प्रमुख 30 समभागांपैकी फक्त बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन व पॉवरग्रीड हे चार समभाग किरकोळ घट दाखवीत बंद झाले. उर्वरित सर्व 26 समभाग लहानशी वाढ दर्शवून स्थिरावले. अर्थात आज चार समभागांमध्ये झालेली घट अत्यंत किरकोळ होती, तशीच उरलेल्या सहवीस समभागांमधील वाढही लहानच होती. यापैकी कोणीही समभाग 1.17 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दाखवीत बंद होऊ शकला नाही. भारती एअरटेल (481), टाटा स्टील (492), सनफार्मा (514), आयटीसी (188) व इन्फोसीस (1,133) यांच्या दरांमध्ये एक टक्क्यांच्या आसपास वाढ झाली.

trading at Lakshmi Pujan The all time high of the index 

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trading at Lakshmi Pujan The all time high of the index